आजच्या घडीला ‘तो’ दिवस महत्वाचे कारण होता

मुळात चाकण या गावाचा तसा काहीबी यापूर्वी संबंध नव्हतंच. काय कुठलाही पाहुणा नाही, की ओळखीचा माणूस नाही, पण मेकॅनिकल इंजिनियर झालो आणि मित्रांच्या नादाने चाकण आलो तसा इकडचा बनून गेलो.

वाटलं नव्हतं की चाकण मानवेल म्हणून, कंपनी त नोकरी साठी, वणवण भटकन्या पासून सुरु झालेला प्रवास हळू हळू पुढे सरकतोय. आज पाठीमागे वळून बघताना नक्कीच आनंद होतोय आणि सोबत प्रश्न ही पडतो आपण नक्की खरच या सर्व दिव्यातून बाहेरून पडलो, नाही का?

उमेदीची आयुष्यातली वर्ष या चाकण शहरात घालवली आणि चाकण चा आयुष्यावर थोर उपकारच म्हणायचं, कित्येक नवीन माणसं भेटली, कित्येक जाणं आज वर च्या प्रवासात आले, भेटले, बोलले, काही नी अर्धवट साथ दिली, काहींनी नाही दिली, सुख दुःख सारं अगदी प्रत्यक्षात अनुभवता आलं ते या चाकण मध्येच.

या सर्व गोष्टींना आणि आजावरच्या प्रवासाला ‘तो’ एकच दिवस कारणीभूत होता, ज्या दिवशी चाकण ला यायचा निर्णय घेतला आणि इकडेच सेटल च्या दृष्टीने वाटचाल झाली. आज mage फिरून त्या दिवसाला शतशः नमस्कार करावासा वाटतो, आणि कुठंतरी स्वतः चीच पाठ थोपवून घ्यावीशी वाटते की शाबास रे पट्ठ्या… अजून बराच प्रवास आहे, यशाच्या उंच शिखराची स्वप्न अजून पूर्ण करायचीयत. पाहू प्रवास तर सुरूच आहे…. 😉

https://amzn.to/3UdLDei

Leave a comment