MIDC मध्ये जॉब शोधणे खरंच अवघड आहे का?

कित्येक जण म्हणण्या पेक्षा डिग्री, डिप्लोमा, किंवा अगदी काही न शिकलेला मनुष्य सुद्धा नोकरीच्या शोधात midc ची वाट पकडतो म्हणजे पकडतोच. आता चाकण midc तर त्यातल्या त्यात महाराष्ट्रात चा नाही तर सगळ्यां भारतात प्रसिद्ध. या midc मध्ये आहेत, ऑटोमोबाईल च्या मोठया मोठया कंपन्या, मोठे मोठे कारखाने, जे गाड्या बनवतात किंवा त्यांचे पार्टस.

चाकण midc मध्ये आहे, महिंद्रा, बॉश, मर्सडीज, हुंदाई, सैनी इत्यादी इत्यादी सारख्या आजस्त्र कंपन्या. ज्या गावाच्या एक टोकाला सुरु होतात आणि दुसऱ्या टोकाला संपतात. आणि यांच्या जोडीला आहेत, यांना लागणारे पार्ट आणि वस्तू पुरवणारे छोटे छोटे उद्योग सुद्धा. आता या सगळ्यांची गर्दी एवढी झाली आहे की चाकण मध्ये नुसती गाड्यांची नाही तर माणसांची नव्हे नव्हे जॉब शोधणाऱ्या आणि हाताला काम शोधणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. आणि ती दिवासेंदिवस वाढत चालली आहे.

कित्येकानी तर जॉब कन्सल्टन्सी चाच बिजनेस करून करोडोची माया कमवून ठेवली आहे, आणि अजून ही खोऱ्याने पैसा ओढण्याचं काम चालू आहे. डिग्री ची पुंगळी घेऊन चाकण, रांजणगाव, तळेगाव, भोसरी midc पालथी घालणाऱ्या जीवांना काहितरी आशा दाखवून कित्येकानी तर कन्सल्टन्सी च्या नावाखाली लुटण्यांचाच धंदा सुरु केला आहे. अर्थात सर्वच असे आहेत असेही नाहीत. जे प्रामाणिकपणे काम करतायत त्यांच्या विषयी तक्रार असण्याचं काही कारणच नाही. पण मला जे अनुभवायला आलं ते ही अगदी करियर च्या नवख्या काळात ते मात्र बहुतेक डिग्री आणि त्यात ही इंजिनियर बनून आलेल्या बहूतेकना अनुभवायला आलं असेल यात मला शंका नाही.

कदाचित काही जणांचा अनुभव वेगळा असेल. पण चाकण मध्ये करियर शोधात केलेली हीच धडपड आज किती कामास आला म्हणून सांगू? आज एवढं काही विशेष वाटत नाही, दुनिया झुकती हैं, झूकाने वाला चाहिये याप्रमाणे आपल्या स्किल वर फोकस केलं की यश हे मिळणारच. हे आज अनुभवातून सांगू शकतो. पण एकंदरीत midc मध्ये काम शोधणे हे सोप्प आहे, पण मनासारखं काम मिळणं हे नक्कीच अवघड आहे, अशा निष्कर्षवर मी आलो आहे. बाकीचे तुमचं mat काय जरूर सांगा. 😄🌹

Leave a comment