तुम्हाला जो फोटो दिसतोय खरं तर हा आजच्या जगातील सर्वात ज्वलंत प्रश्नाला हात घालतोय .

तुम्हाला जो फोटो दिसतोय खरं तर हा आजच्या जगातील सर्वात ज्वलंत प्रश्नाला हात घालतोय .

हा प्राणी जो त्या डोंगराच्या कपारीमध्ये अडकला तो एकटाच संघर्ष करतोय , एकटाच बाहेर पडण्यासाठी झगडतोय , स्वतः ला एकटाच प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतोय , हरणार असं जाणवल्यावर एकटाच रडतोय आणि एकटाच सगळी दुःख सहन करतोय आणि आशा परिस्थितीत त्याची मदत करायला कुणीही नाही जोवर त्याला स्वतः चा जीव गमवावा लागत नाही .

काही लोकांचं आयुष्य ह्या प्राण्यांप्रमाणेच असते. ते एखाद्या संकटात अडकतात , मागे फिरण्याची शक्यता नाही पुढं जाण्याची शक्यता नाही , ते अडकून पडतात . एकटीच रडतात , एकटेच त्रास सहन करतात , स्वतः ला च प्रेरणा देण्याचा प्रयत्नही करतात पण कुठल्याही स्थितीत पुढे जात नाहीत .

काही धार्मिक गुरु , मोटिवेशनल स्पीकर , मित्र अथवा कुटुंबातील व्यक्ती सतत तुम्हाला “स्वतः वर विश्वास ठेवा, तुम्ही खूप बलवान आहात , तुम्ही हे करू शकता ” अशा गोष्टी सांगत असतात पण सगळ्याच गोष्टी एकट्या चालणाऱ्या माणसाला लागू होत नाहीत . कारण एकट्याने चालल्याने माणसाची निर्णय क्षमता अत्यंत कमकुवत होऊन जाते . प्रत्येकच वेळी आपण प्रयत्न करत नः असं होत नाही . कधी कधी आयुष्याची गणित हि न सुटणारी असतात आणि त्यालाच जीवन म्हणतात .

आता तुम्हीच सांगा , त्या प्राण्याने स्वतः ला वाचवण्यासाठी प्रयत्न केले नसतील का?, कि त्याने स्वतः वर विश्वास दाखवला नसेल ? का त्याने जीव ओतून प्रयत्न केले नसतील ?? .

पण कधी कधी एकट्याने एवढे प्रयत्न करूनही त्याला वेदनादायक मृत्यूचा सामना करावाच लागला .. हो ना ..

आणि यामागचं मुख्य कारण होत कि प्रत्यक्षात त्याला बाहेर काढायला , मदत करायला कुणीही उपलब्ध नव्हत.

बऱ्याचदा आपल्या घरातल्या जवळच्या , मित्र परिवारातल्या व्यक्तीलाही तुमच्या प्रत्यक्ष मदतीची गरज असते .

तू करू शकतो , तू खूप बलवान आहे या गोष्टींनी त्याला काहीही फरक पडत नाही .

म्हणून सांगतो , गरज पडल्यास मदत मागायला विसरू नका .
योग्य सोबती घ्याल तर व्यवसायातही प्रवास दूरवर कराल .
निर्णय चुकलेच तर आपल्याला बाहेर काढायला हि कुणीतरी नक्की मदत करेल एवढं नक्की .

लेख आवडल्यास नक्की शेअर करा .

धन्यवाद .

मनोज इंगळे
संस्थापक उद्योगमंत्र मराठी

Leave a comment