ऑनलाईन गेमिंग चा नाद नकोच

बघेल त्या वेबसाईट वर, किंवा ऑनलाईन काहीही सरफिंग करायचे म्हटलं की जाहिराती येतात त्या म्हणजे रमी च्या, तीन पत्ती च्या, ल्युडो खेळाच्या…. या जाहिरातीनी तर नुसता वैताग आणलेला आहे हे नक्की.

प्रत्येक जाहिराती मागे पैसे हेच मोटिव असलं तरी त्यामुळं होणारे फायदे, नुकसान यावर खुली चर्चा व्हायला सुद्धा हवी. कारण हे जर नुसतं असच चालू राहील तर नक्की युवकांचं नुकसान व्हायला वेळ लागणार नाही. काही दिवसांपूर्वी पबजी गेम च्या नादाने कित्येक मुलं बरबाद झाली. वेगवेगळ्या बाजूनं एकूण ऑनलाईन गेमिंग चा विचार केला तर, सहज लक्षात येतं की त्याचा फायदा कमी आणि नुकसान चा जास्त होतं आहे. आणि म्हणून ऑनलाईन गेमिंग चा नाद नकोच.

Leave a comment