फुकटयांना अजिबात जवळ थांबू देऊ नये

१) महापुरुषांच्या जयंतीचा अनुभव : एके दिवशी मी माझ्या फार्महाऊसवर गेलो होतो. तेव्हा तिथे त्या गावातील काही तरुण मंडळी तिथे आली. दरम्यानच्या काळामध्ये एका महापुरुषांची जयंती होती. त्या जयंती कार्यक्रमासाठी वर्गणी मागण्यासाठी ती तरुण मंडळी माझ्याजवळ आली. त्यांची लक्षणे व शरीरभाषा पाहून ती हुल्लडबाजी करणारी गावातील टारगट तरुण मंडळी होती, हे माझ्या तेव्हा लक्षात आलेले होते. बऱ्याचदा त्या गावात येता-जाताना गावच्या कट्ट्यावर बसून इकडे तिकडे हुल्लडबाजी टारगटपणा व धिंगाणा करताना मी पहिले होते. तरी मी त्यांना विचारले की, “तुम्हाला किती रुपये देणगीची अपेक्षा माझ्याकडून आहे?” त्यावेळी ते म्हणाले, “आम्हाला तुमच्याकडून किमान रुपये २०००/- देणगीची अपेक्षा आहे.” मी त्यांना म्हणालो, “मी तुम्हाला ४ हजार रुपये देणगी देतो; परंतु एक अट आहे. तुमचा ८-१० तरुणांचा गट आहे, तुम्ही घरात, शेतात छोटी मोठी कामे करत असाल. माझ्या फार्महाऊस मध्ये ४०-५० झाडे आहेत, आपण बागेची साफसफाई करून झाडांना पाणी घालू. संपूर्ण बंगल्याची साफसफाई करू, त्यासाठी २-३ तास लागतील, मीसुध्दा तुमच्या सोबत काम करीन व काम करता करता जयंती कशी साजरी करायची, काय उपक्रम राबवायचे याबद्दल आपण चर्चाही करू. तुमचा व माझा वेळही जाईल. माझे कामदेखील होईल व त्या कामाच्या मोबदल्यात मी तुम्हाला २ हजार रुपयांऐवजी ४ हजार रुपये देईन.” असा मी त्यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला. माझा प्रस्ताव ऐकून त्या तरुणांना राग आला. त्यांनी त्या प्रस्तावास साफ नकार देऊन ते रागाने तिथून निघून गेले.

२) फुकटयांना जवळ थांबू दिल्यास : आयुष्यात कधीही ज्यांना फुकट खायची सवय असते, अशा फुकटयांना थारा दिल्यास तुम्हाला आयुष्यभर त्यांचा त्रास राहील. त्रास तर होतच राहील. त्याशिवाय तुमच्याकडून फुकट घेऊन बाहेर तुमच्यामागे तुमच्याबद्दलच नेहमी नकारात्मक बोलतात, तुम्हाला नावे ठेवतात. परंतु तुमची कधीच प्रशंसा नाही करत किंवा तुमच्याबद्दल चांगले बोलत नाहीत. तसेच तुम्ही एखाद्याला फुकटचे व आयते देण्याची सवय केली तर तो वारंवार तुमच्याकडे येत राहील. जसं गावातल्या भटक्या कुत्र्याला तुम्ही एकदा भाकरी तुकडा दिला तर दुसऱ्या दिवशी नेमक्या त्याचवेळी ते तुमच्या दारात परत येतं. म्हणजे एखाद्याला काही फुकट दिले तर त्याला रोज पोसायची जबाबदारी नकळतपणे तुमच्यावर येते व त्यांना नाही दिले तर कदाचित ते तुम्हाला त्रासही देतात. “You don’t need to waste your time on someone who only wants you around when it fits their needs.”

३) चायनीज म्हण आणि प्रथा : चीनमध्ये एक म्हण आहे, नव्हे तर तशी एक प्रथाच आहे “Treat your guest as a guest for two days, then on the third day, give him a hoe” म्हणजेच आपल्याकडे आलेल्या पाहुण्याला पहिले दोन दिवस पाहुण्याप्रमाणे वागवा; तिसऱ्या दिवशी त्याच्या हातात कुदळ द्या, ही त्यांच्या संस्कृतीमध्ये परंपरा आहे. एखादा नातेवाईक आपल्या घरी आला किंवा आपण एखाद्या नातेवाईकांच्या घरी गेलो, तरी पाहुणचार हा फक्त एक दिवस करायचा असतो. चीनमध्ये एक दोन दिवसांपेक्षा जास्त थांबणाऱ्या पाहुण्याच्या हातात खुरपे, कुदळ देऊन त्याला शेतात काम करायला लावले जाते. म्हणजे कोणालाही आयते व फुकट खाऊ देऊ नये व फुकट थाराही देऊ नये.

४) फुकट बंद केल्यास फायदे : फुकटयांना देणे बंद केले तर कुणीही व्यक्ती तुमच्याकडे बिनकामाचे येणार नाही किंवा तुमच्याकडे थांबणार नाही आणिअशा फुकट्या व बिनकामाच्या व्यक्तींपासून होणाऱ्या त्रासापासून तुम्ही वाचाल. फुकटयांचे येणे जाणे बंद झाले तर तुमच्याकडे केवळ महत्वाची, उपयोगाची व कामाचीच माणसे तुमच्यासोबत राहतील. फुकट्यांमुळे आपला वाया जाणारा आपला बहुमोल वेळ ही वाचतो व या उपलब्ध वेळेचा उपयोग तुम्ही जीवनात प्रगती साधण्यासाठी, आयुष्याला योग्य दिशेने जाण्यासाठी वापरू शकाल. “Stop wasting valuable time with worthless people..”

५) मी काय करतो? : मी माणदेशासारख्या ग्रामीण भागातून आलो आहे. मीही सुरूवातीला समाजात काय चालले आहे, त्याचप्रमाणे वागत असे; परंतु जेव्हा मी मुंबईत आलो, व्यवसाय-उद्योग व करियरमध्ये अत्यंत यशस्वी झालेल्या व्यक्तींशी संपर्क आला, त्यावेळी त्यांच्याकडे पाहून त्यांचे निरीक्षण करून माझ्या असे लक्षात आले की, हे लोक कशा पध्दतीने वागतात व उच्च जीवनशैलीमध्ये जगतात. मी त्यांच्या अनुभावातून शिकलो की, फुकट्या लोकांसोबत फोनवर सुध्दा बोलणे टाळावे. समोरचा व्यक्ती काहीच कामाचा नसेल किंवा भविष्यातही त्याच्याकडून कामाची काही अपेक्षा नसेल अथवा आपल्यामुळे त्याचा व त्यांच्यामुळे आपला काहीच फायदा होणार नसेल त्यांच्याशी संबध ठेवू नयेत. जर एखाद्याशी योग्य विचार व व्यवहाराची देवाण-घेवाण होऊ शकत नसेल तर अशा लोकांसोबत मी माझा वेळ वाया घवलात नाही. समोरचा व्यक्ती आपल्याशी आर्थिक व्यवहार न करता फुकट सेवेची अपेक्षा करत असेल तर मी त्याचा फोनसुध्दा उचलत नाही. हे सूत्र तुम्हीही तुमच्या आयुष्यात लागू करा. “Don’t waste time by giving importance to useless people.”

६) आपण काय करावे? : आपण जीवन जगत असताना कोणताही व्यवहार करत असताना सर्वात आधी स्वत:वर शिस्तीची बंधने घालून घ्यावीत. कोणालाही काहीच फुकट देऊ नये व आपणही कोणतीही गोष्ट कुणाकडूनही फुकट मागू नये किंवा तशी अपेक्षाही करू नये. ग्रामीण भागात दुसऱ्यांकडून फुकट मागण्याचे प्रमाण अधिक असते. कोणतीही गोष्ट फुकट मागू नये. इतरांच्या कोणालाही गोष्टींचा वापर केला तर ताबडतोब त्याचा मोबदला द्यावा, कोणी तुमच्याकडे एखादी गोष्ट फुकट मागत असेल तर त्याला अजिबात थारा देऊ नये. त्याला स्पष्टपणे नकार द्यावा, त्यामुळे तो पुन्हा पुन्हा तुमच्याकडे काहीच फुकट मागायला येणार नाही व तुमचा मन:स्ताप टळेल आणि दुसरी गोष्ट यामुळे त्याला खरोखरच राग आल्यास तो पेटून उठेल, तो स्वयंभू होऊन स्वत: ती गोष्ट विकत घेईल किंवा तो स्वत: स्वयंपूर्ण होईल; या निमित्ताने तुमच्या हातूनही एक सत्कर्म घडेल. “Never Lower Your Standards For Worthless People.”

डॉ. प्रकाश भोसले हे व्यवसाय सल्लागार व लेखक आहेत. उद्योग विषयक विविध पैलूंबाबत मार्गदर्शन करतात. सदिच्छा व प्राथमिक भेटीसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर व्हाट्सअप करा व अपॉइंटमेंट निश्चित करा.
संपर्क: +९१ ८६५२८ ४७३७८

वाचकांसाठी खुशखबर !!!
डॉ. प्रकाश भोसले लिखित ‘उद्योजकता’ हे प्रेरणादायी पुस्तक आता bookganga.com वर ऑनलाईन उपलब्ध. पुस्तक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.bookganga.com/R/7T12C

नियमित आमचे लेख मिळवण्यासाठी +९१ ९८६७८०६३९९ हा नंबर तुमच्या व्यावसायिक व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट करा

अधिक माहितीसाठी संपर्क साधा
व्हॉट्सअ‍ॅप: +९१ ८६५२८४७३७८
संपर्क वेळः – सोमवार ते शनिवार सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.००

© प्रकाश भोसले
ISBN 978-81-929682-0-12
.
.
.

powerty #businesssop #technology #businessmanagement #startup #businessidea #startups #mybusinesssiness #ownbusiness #business #seo #businessgrowth #entrepreneur #SelfEmployed #motivational #drprakashbhosale #businessconsultant #drprakashbhosale #viral #maharashtra #marathi #mumbai

Leave a comment