वजन कमी करण्यासाठी हळदीचे पाणी प्या !!

आपल्या घरात अनेक मसाले असतात. त्यांचा उपयोग जेवण बनवण्यासाठी केला जातो. परंतु अनेक मसाले आहेत त्याचा आरोग्यासाठीही फायदा होतो. हळद हा त्यातील एक प्रमुख मसाला आहे.

हळदीत अनेक औषधी गुण असतात, हळदीत अँटीऑक्सिडेंट्स, अँटीइन्फ्लेमेंटरी तसेच अँटीबॅक्टेरियल गुण असतात. त्यामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो. हळद आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हळदीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच वजन कमी होण्यासही मदत होते. यासाठी जाणून घेऊया हळदीचे पाणी कसे बनवावे आणि त्याचे इतर फायदे.

असे होते वजन कमी :-
हळदीत पोषक तत्व असतात, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हळदीत पॉलेफेनॉल करक्यूमिन कम्पाऊंड असतं त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी पाण्यात हळद घालून प्यावे.

असे बनवा हळद पाणी :-
हळदीचे पाणी बनवण्यासाठी हळदकुंडाची कुटलेली हळद घ्या. त्यात दोन कप गरम पाणी टाका. त्यानंतर त्यात मध मिक्स करा. पाणी थोडे कोमट झाल्यानंतर या पाण्याचे सेवन करा. शक्यतो रिकाम्या पोटी हे पाणी प्या त्यामुळे वजन लवकर कमी होण्यास मदत होती.

हळदीचे पाणी पिण्याचे फायदे :-
हळदीचे पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होतेच, शिवाय रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायल्यास सांधेदुखी दूर होते. हळदीत अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुण असतात, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हळदीचे पाणी प्यायल्यास आजारांपासून लढण्याची ताकद मिळते. हळदीचे पाणी प्यायल्यास सर्दी खोकलाही दूर होतो.

माहिती आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता इतर ग्रुप वर शेअर करा📲

हळदीचे पाणी प्यायल्यास हृदरोगाचा धोका कमी होतो. तसेच हळदीच्या पाण्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलही कमी होतो. हळदीचे पाणी प्यायल्यास रक्ताच्या गाठी तयार होत नाही.

(सौजन्य :व्हाट्सअप ग्रुप )

Leave a comment