मधुमेह म्हणजे काय…?

रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा प्रमाणाबाहेर वाढणे म्हणजेच मधुमेह..... शरीराला आववश्यक असलेल्या उर्जेसाठी आहारातून मिळालेल्या अन्नाचे साखरेत रुपांतर केले जाते..... स्वादुपिंडातून पाझरणार्‍या इन्शुलिन नामक हार्मोनचा ह्या क्रियेत महत्वाचा सहभाग असतो..... ह्यामुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींमध्ये सामावली जाते..... पुढे तिचे ग्लायकोजिनमध्ये रुपांतर होऊन ते यकृतात साठवले जाते..... काही कारणांमुळे रक्तातील साखरेची पातळी खालावली तर अशा संग्रहित ग्लायकोजिनचे रुपांतर पुन्हा साखरेत होते..... त्यामुळे रक्तातील साखर कमी होणे (हायपोग्लायसेमिया) व त्यापासून उद्भवणाऱ्या लक्षणांवर नियंत्रण राखले जाते..... मधुमेह झालेल्या व्यक्तींत इन्शुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते..... आवश्यक प्रमाणात इन्शुलिन तयार न झाल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते व मधुमेहाची सुरुवात होते....

कोणती आहेत मधुमेहाची लक्षणे:-
१) सतत तहान लागणे….
2) घशा मध्ये कोरड पडणे
3) हाता-पायाची खाज सुटणे…
4) जखम बरी न हाेणे…
5) वारंवार लघवी ला येणे ..
6)लघवी करताना त्रास हाेणे…
7) डाेळ्यांची जळजळ हाेणे व नजर दोष निर्माण होणे आदी….
8)पायाच्या तळव्यांची जळजळ होणे
9)पोट साफ न होणे/पचनक्रिया मंदावणे, बिघडणे.

Leave a comment