डोळ्यांसाठी टिप्स

●चंदन आणि जायफळाची पेस्ट डोळ्यांभोवती रात्री लावून ठेवावी. सकाळी धुऊन टाकावे. यामुळे डोळ्यांना गारवा मिळून त्याखालील काळी वर्तुळे नाहीशी होतील.

●गाजराचा कीस, बीटाचा कीस, कच्चे दुध समप्रमाणात एकत्र करून डोळ्याखाली किंवा डोळ्याच्या अवती-भोवती हलका मसाज करावा. डोळ्याच्या भोवती आलेली काळी वर्तुळे नाहीशी होतील.

●डोळ्यांच्या खाली काळी वर्तूळे तयार झाली असल्यास रोज डोळ्यांच्या खालच्या बाजूस कच्च्या बटाट्याच्या तुकड्यांनी हलकी मालिश करावी. काळी वर्तूळे हळू-हळू कमी होण्यास मदत होईल.

●पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर कच्ची पपई किसून लावावी.

◆इतर उपाय
● काकडीच्या थंडगार चकत्या, मोगऱ्याचा गजरा, बर्फ रुमालात बांधून डोळ्यावर ठेवून दहा ते पंधरा मिनिटे शांत झोपावे.

Leave a comment