ऊसाचे औषधी गुणधर्म

ऊसाचे औषधी गुणधर्म

१) मूत्ररोग:- मूत्ररोगांत ऊस रामबाण आहे.
अ) ऊसाचा शिळा रस पिल्याने मूत्रवृद्धी होते.

ब) सकाळ संध्याकाळ दररोज १५ दिवस लागोपाठ ऊसाचा शिळा रस प्यायल्याने लघवीला साफ होते. त्याचबरोबर लघवीतील जळजळ दूर होते.

क) उसाच्या शिळ्या रसामध्ये मुतखडयाचा नाश करण्याची ही शक्ती असते.

*२) उलटीचा त्रास :-
अ) चांगल्या तऱ्हेने पिकलेल्या ऊसाचा रस पिल्याने उलटी बंद होते. एवढेच नव्हे तर ऊसाचा रस पिल्याने पित्तविकार दूर होतात.
ब) पित्ताच्या उलटीमध्ये उसाचा रस अवश्य प्यावा.
क) तुळशीचा रस, वेलदोडे व आल्याच्या रसाबरोबर घेतल्यास उलटया थांबतात.

३) रक्तदाब:- रक्तदाबामध्ये ऊसाच्या रसाचा उपयोग अत्यंत लाभदायक ठरतो. ऊसाच्या रसाबरोबर थोडासा आल्याचा रस मिसळून दररोज पिल्यास रक्तदाब सामान्य होतो.

४) टॉन्सिल्स:- ऊसाचा रस गरम करून त्यात समभाग दुध मिसळून दररोज सकाळ संध्याकाळ पिल्याने टॉन्सिल्सची सूज कमी होते.

५) थकवा:- अतिश्रमाने आलेला थकवा दूर करण्यासाठी ऊसाचा ताजा रस चमत्कारिक ठरतो. ऊस चावून खाल्यास किंवा ताज्या ऊसाचा रस पिल्यास थकवा तात्काळ दूर होतो.

६) मंदाग्नी:- ऊसाचा रस पाचकाग्नी वाढविण्यासाठी औषधी ठरतो. ऊसाचा रस पाचनशक्ती वाढवून भूक वाढवितो.

७) काविळीवर:- अ) ऊसाचा रस पोटभर दररोज घ्यावा सात दिवसात कावीळ जाते.
ब) ताज्या ताकात चमचाभर हळद मिसळून घेणे काविळीवर लाभदायक ठरते.

८) उचकीवर:- अ) ऊसाचा रस पोटभरून घेतल्याने उचकी थांबते.
ब) गुळाच्या पाण्यात सुंठ उगाळून ३ ते ४ थेंब गळून टाकावे उचकी थांबते.
क) उचकी थांबत नसल्यास तुळशीचा रस व मध घेतल्यास आराम मिळतो.

९) उन्हाळी लागत असल्यास:- अ)१ कप दुधात १० ग्रॅम गुळ उकळून दररोज प्यावा. सात दिवसात वरील रोग बरा होतो.
ब)२० ग्रॅम साखर, एक कप दह्याबरोबर घ्यावे उन्हाळी जाते.

१०) मस्तकशूळ,सूर्याव्रत व अर्धशीशी वर:- गुळ १० ग्रॅम व तुप १० ग्रॅम एकत्र करून सूर्योदयापूर्वी खावे. व कपाळास काळे तीळ दुधात वाटून लावावे.

११) काच, खडा अथवा खीळा, काटा लागल्यास गुळ गरम करून त्या जागेवर चटका दयावा.

१२) गोम चावल्यास:- गुळ जाळून लावावा.

१३) तहान अती लागत असल्यास:- १० ग्रॅम खडीसाखर १ कप पाण्यात मिसळून घ्यावे. तहान शमते.

१४) धुराने डोळे ख़राब झाल्यास:- गुळाचे पाणी गाळून ३ ते ४ थेंब डोळ्यात टाकावे.

१५) जुलाब बंद होण्यासाठी:-
अ) १० ग्रॅम खडीसाखर १ कप पाण्यात विरघळून घ्यावे. जुलाब बंद होतात.
ब) लहान मुलांना जुलाब झाल्यास तुळशीच्या रसात गाईचे दुध मिसळून द्या.

१६) गुडघी रोगावर:- गुळ, ओला चुना व वेखंडाचे चुर्ण एकत्र करून व घोटून लावावे. गुडघी रोग बरा होतो.

१७) कंबर दुखण्यावर:-
गुळ, खोबरे, लसूण, बिब्बे, तीळ हे सर्व समभाग घेवून कुटुन व घोटून हरभऱ्या एवढ्या गोळ्या कराव्यात, दररोज दोन गोळ्या गरम पाण्याबरोबर घ्याव्यात. एक महिन्यात कंबरेतील ठणका जावून (शुळ) कंबर बळकट होते.
..

🌹🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺🌹

माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा📲

Leave a comment