स्कॉलरशिप परीक्षा नेमकी कशासाठी द्यायची?

Delta Institute for Youth Development

स्कॉलरशिप परीक्षा नेमकी कशासाठी द्यायची?
उत्तर: भरपूर वेळेस असं बोललं जात कि, पुढे जाऊन स्पर्धा परीक्षा वगैरे देण्यासाठी सराव म्हणून त्याचा फायदा होईल. पण नीट विचार केला तर केवळ स्पर्धा परीक्षेची तयारी अगदी शालेय वयापासून करण्यासाठीचं स्कॉलरशिप परीक्षेचा उपयोग होतो असं नाही.

विद्यार्थी वया मध्ये असताना, स्पर्धा परीक्षा दिल्या असता, पुढीलप्रमाणे फायदे होतात.

1.स्पर्धा परीक्षेची बेसिक तयारी
शालेय वयात चं स्पर्धा परीक्षा देण्याची सवय लागल्या मुळे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ला पुढे पदवी नंतर च्या स्पर्धा परीक्षांची तयारी करने सोपे जाते. प्रश्नाचे स्वरूप, सोडवाण्याची पद्धत जवळ जवळ समान असल्यामुळे आयती तयारी होऊन जाते.

  1. स्पर्धात्मक तणावाला सामोरं जाणं
    आधी पासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी केल्यामुळे स्पर्धेचा तणाव काय असतो त्याची जाणीव होते.
  2. वेळ नियोजना ची सवय
    ठरलेल्या वेळेत अभ्यास करने, पेपर सोडवणे, कमी वेळेत उत्तरं शोधणे, इत्यादी गोष्टीमुळे वेळच नियोजन योग्य प्रकारे करण्याची सवय लागते.
  3. विविध दृष्टीने विचार करने
    एखादा प्रश्न किंवा परिस्थिती कडे वेगवेगळ्या दृष्टीने बघण्याची सवय या परीक्षांच्या तयारी दरम्यान मुलांमध्ये रुजत असते.
  4. नियमित अभ्यास, वाचन मनन
    या वरील गोष्टींची सवय लागली कि जीवनातल्या बऱयाच गोष्टी सुलभ होतात.

म्हणून केवळ स्कॉलरशिप मिळवने किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी होते म्हूणन स्कॉलरशिप परीक्षेला न बसता सर्वांगीण बुद्धीचा विकास, चौकस दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये विकसित होण्यासाठी अशा शालेय स्पर्धा परीक्षाना जरूर बसावे.

लेखक: इं. आनंद वाघमारे
संचालक, डेल्टा युवा विकास संस्था, चाकण
व्हाट्सअप: 7841012584

स्पर्धा परीक्षा विषयी इतर लेख वाचण्यासाठी आमच्या वेबसाईट ला जरूर भेट द्या. आणि स्कॉलरशिप, नवोदय, सैनिक स्कुल प्रवेश परीक्षा तसेच अन्य शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्हिडीओ लेक्चर पाहण्यासाठी आमच्या यु ट्यूब चॅनेल ला जरूर subscribe करा.

वेबसाईट: http://www.diyd2016.wordpress.com

युट्युब चॅनेल ला सबस्क्क्राइब करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
https://www.youtube.com/@diyd2016

Leave a comment