मुख्य घडामोडी 23 फेब्रुवारी 2024


● मराठा आरक्षणाच्या ‘GR’नंतरच पोलिस भरती; १० टक्के आरक्षणाप्रमाणे रोस्टर बदलणार; तरूणांची वयोमर्यादा वाढवून देण्याची मागणी

● शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं निवडणूक चिन्ह; निवडणूक आयोगाची घोषणा

● हुक्का बारवर बंदी विधेयकास मंजुरी; सिगारेट विक्रीवरही राहणार बंदी; दंडासह तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची सजा

● शिक्षक भरती प्रक्रिया वेगात सुरु; उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार

● कर्नाटकातील मंदिरांकडून वसूल केला जाणार 10 टक्के टॅक्स, कर्नाटक सरकारचा निर्णय

● आम्हाला तुमचे 1000 रुपये नको, सन्मान आणि शांतता हवीये; पीडित महिलेने ममतांना सुनवले

● CAPF अन् आसाम रायफल्समध्ये 24 हजार जवानांच्या प्रतिनियुक्तीला मंजुरी, गृह मंत्रालयाचा आदेश

● काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना Z+ सुरक्षा, गृह मंत्रालयाचे आदेश

● राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 25 फेब्रुवारीला आग्र्यात; अखिलेश यादव होणार सहभागी

● महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन

Leave a comment