Educational Topics

*रेँक आणि मार्क यातलं अंतर समजून घेण गरजेचे आहे. : इं. आनंद वाघमारे*
http://www.diyd2016.wordpress.com

गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे परीक्षा परिणाम घोषित झालेत. पूर्वी पासून एका समज जो डोक्यात घट्ट पकड़ करून बसलाय तो म्हणजे दहावीचे मार्क किती? बारावीचे किती टक्के ? आणि त्यावर आधारित असणारी कुठला मुलगा मुलगी चांगला आणि कोण किती वाईट हे ठरवण्याची पद्धत.

मुळात एक गोष्ट लक्षात आणून द्यायला मला आवडेल की मार्क हे गुणवत्ता किंवा चांगले पणाच लक्षण होऊ शकत नाही.
राहिला प्रश्न उत्कृष्ठ कॉलेज भेटणे त्यासाठी चांगले टक्के पाहिजेत तर हे साफ चुकीच आहे.

विशिष्ट कोर्स किंवा चांगले कॉलेज मिळवण्यासाठी खूप जास्त टक्के मिळवण्यापेक्षा जास्त गरजेचं आहे जास्त चांगली रेँक मिळवणं.
आणि अर्थातच मार्क चांगले तर रेँक सुद्धा उत्तम असण्याची फक्त शक्यता जास्त असते; उत्तम असतेच असं मात्र नाही. दोन्ही गोष्टीत फरक आहे.
म्हणून दहावी बारावी नंतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत ज्यातून पुढे एखाद्या इंजिनियरिंग मेडिकल किंवा अन्य कोर्सेस ना प्रवेश घेतला जातो; त्यात टक्केवारी फायद्याची नसून; नेशन्ल रेँक किती;स्टेट रेँक किती;सोशल केटेगरी रेँक किती; रिजर्वेशन किती; कोटा किती इ. गोष्टींचा विचार करून फॉर्म भरावा अस मला आवर्जून सांगावसं वाटतं. केवळ माहिती अभावी चांगल कॉलेज किंवा कोर्स मिळण्याची संधी हुकु शकते. त्यासाठी योग्य ती माहिती अगोदर मिळवावी. अगोदर चा कट ऑफ पहावा व मग अर्ज करावा.
या वर एक वेगळा स्वतंत्र लेख लिहिता येईल.
दहावी-बारावी- NEET इ. सर्वच परीक्षेत यश मिळवलेल्या सर्वांचे अभिनँदन.शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया विषयी इतर माहिती करीता आपण ‘डेल्टा’ कडे संपर्क करू शकता.
*”डेल्टा युवा विकास संस्था”; मेदनकरवाडी ग्रामपंचायत जवळ; चाकण ता.खेड जि.पुणे*
*मो.नं.7841012584*

शैक्षणिक;तसेच युवा वर्गाला उपयुक्त माहिती करीता आमच्या सोबत वॉटसप ग्रुप ला जॉइन व्हा. टेलीग्राम तसेच यूट्यूब चेनेल सबस्क्राइब करा.

*वॉटसप ग्रुप लिंक*
1. https://chat.whatsapp.com/K0j4nSJIrRIGTEfosZkN4i

2. https://chat.whatsapp.com/HxKKE2FV3xaBYd0cNMyNIf

*टेलीग्राम लिंक*
https://t.me/deltaforyouths

*Youtube लिंक*
https://bitlylink.com/ytF5b

*फेसबुक पेज*
Delta Institute for Youth Development

*वेबसाईट*
http://www.diyd2016.wordpress.com

*ई-मेल*
diyd2016@gmail.com

*वॉटसप*
7841012584

*डेल्टा युवा विकास संस्था;चाकण*
*_LIKE AND SHARE_*

Educational Topics

📖स्पर्धा परीक्षांसाठी वाचनाचे महत्व 📖

वाचाल तर वाचाल मराठी मधील अतिशय प्रसिद्ध म्हण ३ शब्दात वाचानाचे महत्व सांगते.

आज जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने वाचनाविषयी लेखन करून संवाद साधण्याची संधी घेत आहे.

स्पर्धा परीक्षांचा विशेषत: MPSC/UPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचन ही एक सवय असलीच पाहिजे. वाचनातून कुतूहल वाढते. कुतूहल वाढले की जाणीव करून घेण्याची इच्छा दृढ होते. जाणीवेतून विश्लेषात्मक वृत्ती विकसित होते. निरीक्षण शक्ती वाढते.
कल्पना शक्ती सुधारते, प्रेरणा मिळते आणि असे अनेक. वाचनाने तुमची फक्त भाषाच नाही तर तुमचे व्यक्तिमत्त्वही प्रगल्भ होते.

✍स्पर्धा परीक्षा देण्याचे बारावी अथवा पदवी ला असताना ठरवले असेल तर अशा विद्यार्थ्यांनी किमान रोजचा १ तास अवांतर वाचन आणि एक तास वृत्तपत्र वाचन केले पाहिजे.
जे विद्यार्थी २०२० मध्ये परीक्षा देणार आहेत त्यांनी किमान 30मिनिटे अवांतर वाचन केले पाहिजे.
त्याचा फायदा तुम्हाला लॉजिक डेव्हलमेंट आणि निबांधमध्ये नक्की होईल.

📌मला वाचनाची सवय नाही, खूप कंटाळा येतो, पुस्तक वाचायला घेतले तरी सातत्य राहत नाही असे वाटणार्यांसाठी काही महत्वाचे मुद्दे –

(किमान ३ महिने न चुकता वाचन केल्यास ती सवय बनते.)

📖 सुरवातीला ५०-१०० पानी छोटी पुस्तके वाचा. प्रेरणादायी पुस्तके वाचल्यास वाचनाचा उत्साह वाढतो. छोट पुस्तक आहे म्हणून दोन दिवसात पूर्ण करू नका. सवय लागेपर्यंत रोज १०-१२ पानेच वाचा. सातत्य टिकवायचे असेल तर सुरवातीच्या काळात लहान उद्दिष्टे ठेवणे फायद्याचे ठरते. (स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासालही हे तत्त्व लागू पडते. ) तुमचा वाचनाचा किंवा अभ्यासाचा आलेख आहे हळुवार पण नेहमी वाढता असेल यासाठी प्रयत्न करा. घाई नको.
📖पुस्तक कसे निवडू हा प्रश्न अनेकदा विद्यार्थ्यांना पडतो. वर सांगितल्या प्रमाणे प्रेरणादायी/ आत्मचरित्रपर पुस्तके सुरवातीला निवडू शकता. तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे त्या विषयावरील पुस्तकांपासून सुरवात करा.
📖 The Hindu सारख्या काही वृत्तपत्रांमध्ये अनेक चांगल्या पुस्तकांवर चांगल्या वाचकांची प्रतिक्रिया / सरांशे सदर येत असते. ते वाचून कोणते पुस्तक वाचावे हे ठरवू शकता. (सवय लागल्यानंतर च हा प्रयोग करा.)
📖चालू घटनांवरील काही लेख / संपादकीय आवर्जून वाचा. परीक्षेला फायदा होईलच पण अनेक विषय जाणून घेता येतील.
📖स्वतः ला चॅलेंज करून एका महिन्यात किमान दोन नवीन पुस्तके वाचा.
📖 पुस्तक वाचताना त्यातील महत्वाचे मुद्दे, वाक्य अथवा घटना वहीत नोंदवत जा.
📖 अच्युत गोडबोले सरांची पुस्तक नक्की वाचा. अतिशय सोपी परंतु खोलवर विषय समजून सांगणारी भाषाशैली आहे.( हे वैयक्तिक मत आणि अनुभवाचे बोल आहेत. तुम्ही असा कोणताही लेखक निवडू शकता)
📖जी भाषा आपल्याला समृद्ध करायची आहे त्या भाषेतील छोटी पुस्तके वाचा. ज्यांना इंग्रजी समृद्ध करायची आहे त्यांनी विवेकानंद , गांधीजी, ऐतिहासिक पुस्तके वाचा. थोडक्यात ज्यासंबंधी आपल्याला काही माहिती आहे, अशी विषयावरील पुस्तके इतर भाषांमध्ये वाचल्यास संदर्भ लावून शब्दसंग्रह वाढतो आणि ती भाषा सुधारण्यास मदत होते.
📖 रामदास म्हणतात त्या प्रमाणे ‘ दिसामाजी काहतरी लिहावे, परी अखंडित वाचीत जावे’.
( दिवसातून काहीतरी लिखाण करा , इतर वेळेत वाचन करा.) लेखनशैली सुधारण्यासाठी वाचन अतिशय महत्वाचे आहे.
📖सोशल मीडिया वर जितका वेळ घालवता त्यातील ५०% वेळ पुस्तक वाचनास देऊन पाहा. व्यक्तिमत्त्वात नक्की सुधारणा होईल.

टीप १: MPSC च्या अभ्यासाला पूरक अशी काही संदर्भ पुस्तके अवांतर वाचन म्हणून वाचू शकता. उदा: भारताचा स्वातंत्र्यलढा बिपिन चंद्र
आपले संविधान + आपली संसद – सुभाष कश्यप
10 Judgements That Changed India- Zia Modi
अर्थात- अच्युत गोडबोले …… इ.

टीप:२अगदी लहान मुलांची पुस्तके वाचण्या पासून सुरवात केली तरी चालेल. आजकाल ऑनलाईन अनेक पुस्तके pdf फॉरमॅट मध्ये उपलब्ध आहेत, कॉपी राईट चे उल्लंघन न करता तुम्ही ती पुस्तके वाचू शकता.

लेखाबद्दल अभिप्राय जरूर कळवा.

– श्रुती गुजर – मेहता
(संचालिका, MPSC INSIGHTS)

Educational Topics

शाळेत दाखवण्याजोग्या अंधश्रद्धा निर्मूलन करता येईल अशा शास्त्रीय पध्दती.

काळीजादू

१.जादू कुंकू काळे करण्याची

शिक्षीत लोकांनी आपल्या शिक्षणाचा व विज्ञानाचा उपयोग करून अंधश्रद्धेचे निर्मुलन केले पाहिजे अर्धा लहान चमचाभर कुंकूवात निरमा पावडर घ्या निरमा पावडरात अल्कली असते आणि कुकंवात अल्कली मिळताच काळे होते नेमके हिच कृती करून बुवालोक स्त्रियांना घाबरवून त्यांच्या मनात भीती निर्माण करतात.

२.जादू हळदीचे कुंकू करण्याची

बाबा लोक हळदीमध्ये थोडा प्रमाणात आधीच निरमा पावडर मिसळून ठेवतात निरमा पावडर अल्कली असते आणि अल्कली मुळे हळद लाल होते नेमके हिच कृती करून बाबालोक भोळ्या भाबड्या स्त्रियांना घाबरवून फसवितात.

३.वस्तू गोड करणे

सॅकरीन साखरेपेक्षा कित्येक पटीने गोड असते बाबा लोक ज्या ही वस्तूला हात लावतील ती वस्तू गोड होते तिर्थ गोड होते यासाठी बाबा लोकांनी सॅकरीनच्या गोळ्यांची पावडर आधीच हाताच्या बोटाला चोळली असते बिचारे भक्त यापासून अनभिज्ञ असतात आणि याच गोष्टीचा फायदा बाबा उचलतात.

४.लिबांतून रक्त काढणे

साहित्य–एक लिबूं चाकू मिथील ऑरेंज च द्रावण चाकुच्या पात्याला मिथील ऑरेंजच द्रावण लावावे थोड्या वेळाने त्या चाकुणे लिबूं कापल्यास लाल रक्ताप्रमाणे रस बाहेर येतो ही कृती तुम्ही कोणत्याही मंत्र न म्हणता करू दाखवू शकतात व लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करू शकता

५.ताब्यांचे भांडे वर उचलणे

ताब्यांचे लोटी घ्या.(भरणे) ते काठोकाठ तांदूळाणे भरूण घ्या त्यामध्ये एक साधारण मोठा पेचकस घेवून तो 4ते5 वेळा टोचा तांदूळाचे दाणे हवा निघून गेल्यावर एकदम फिट होतात तेव्हा पेचकस वर उचलूण घ्या ताब्यां वर उचलला जाईल.

६.रसाने भरलेल्या लिंबूतून अग्नीच्या ज्वाळा निघणे.

चाकूच्या टोकास सोडीयम धातू घासून ठेवा. आता लिंबू डाव्या हातात घेऊन मुठीजवळील चाकूच्या पात्याने तो अर्ध्यापेक्षा जास्त कापा व चाकू अलगद बाहेर काढत फट बंद करा. लिंबावर दाब देत फट मोठी करताच अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडतील.
यात लिंबाच्या रसाचा सोडीयमशी संयोग होऊन हायड्रोजन मुक्त होतो. हायड्रोजन चटकन पेट घेतो व सोडीयम पिवळ्या रंगाने जळतो. म्हणून हि ज्योत आपल्याला चमकदार पिवळ्या रंगाची दिसते. फक्त लिंबू कापताना शरीरापासून दूर ठेवा.

७.पाण्याने दिवा कसा पेटू शकतो.

एका दिव्यात पाणी घ्या. त्यात कॅल्शिअम कार्बाईडचे छोटे खडे टाका आणि पेटवा. दिवा आपोआप पेटेल. हे कसे झाले?
जेव्हा आपण पाण्यात कॅल्शिअम कार्बाईडचे खडे टाकतो तेव्हा त्यांची पाण्यावर अभिक्रिया होऊन ‘अॅसिटिलीन’ वायू तयार होतो जो ऑक्सीजनच्या सानिध्यात जळतो व पांढरी शुभ्र ज्योत तयार होते. आणि लोकांना वाटतं दिवा पाण्याने पेटला. तुम्हीसुद्धा करून पहा हे खडे तुम्हाला एखाद्या वेल्डरकडे सहज उपलब्ध होतील. मग कधी पेटवणार ‘पाण्याने’ दिवा..?

८.आपोआप त्या मेणबत्त्या पेटणे.

मित्रांनो चमत्कार सोपा आहे पण खूप काळजी घ्यावी लागेल.
तुम्हाला पिवळा फॉस्फरस व कार्बनडाय सल्फाईडचं द्रावण वापरायचं आहे. पिवळ्या फॉस्फरसचा ज्वलनांक केवळ ३४॰ से. असल्याने तो सामान्य तापमानातही लगेच पेट घेतो हे आपण दहावीत शिकलोय. तर या फॉस्फरसला कार्बनडाय सल्फाईडमध्ये विरघळवा. आणि तयार झालेल्या द्रावणात मेणबत्तीची वात भिजवा. कार्बनडाय सल्फाईड बाष्पनशील असल्याने तो हवेत उडून जातो व वातीवर फक्त पिवळा फॉस्फरस रहातो.. त्याच्या कणांना हवा लागली कि तो लगेच पेट घेतो पर्यायाने वातसुद्धा सहज पेट घेते आणि तुम्ही चमत्कारी बाबा ठरता.

९.लिंबातून अक्षरश: ज्वाळा निघू लागणे.

एक चाकू घ्या. चाकूच्या टोकास सोडीयम धातू घासून ठेवा. आता लिंबू डाव्या हातात घेऊन मुठीजवळील चाकूच्या पात्याने तो अर्ध्यापेक्षा जास्त कापा व चाकू अलगद बाहेर काढत फट बंद करा. लिंबावर दाब देत फट मोठी करताच अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडतील.
यात लिंबाच्या रसाचा सोडीयमशी संयोग होऊन हायड्रोजन मुक्त होतो. हायड्रोजन चटकन पेट घेतो व सोडीयम पिवळ्या रंगाने जळतो. म्हणून हि ज्योत आपल्याला चमकदार पिवळ्या रंगाची दिसते. फक्त लिंबू कापताना शरीरापासून दूर ठेवा.

१०.अग्नीशिवाय यज्ञ पेटवणे.

या चमत्कारात मांत्रिक बाबा यज्ञाची सर्व सामग्री यज्ञकुंडात टाकतो पण आपल्या नकळत त्यासोबत नारळाची बुरी आणि कागदाचे तुकडेही टाकतो. मंत्राचा जाप करत तो त्यावर यज्ञात टाकावयाची विभूती व गायीचे तुप सोडतो आणि काय चमत्कार यज्ञ आगपेटीशिवाय आपोआप पेटतो आणि आपण धन्य होऊन बाबाला शरण जातो.
पण मित्रांनो खरी गंमत इथेच आहे मंत्र म्हणताना बाबा जी विभूती त्या न पेटलेल्या यज्ञावर टाकतो ती Potassium Permanganate (KMno4) ची बारीक पावडर असते व ती दिसायला काळी असल्याने कुणाला संशयही येत नाही. आणि गायीचे शुद्ध तुप हे ग्लिसरीनचे काम करते. ज्यावेळेस बाबा हे तुप त्या बुक्कीवर सोडतो तेव्हा Potassium permanganate वर ग्लिसरीनची प्रक्रिया होऊन निळसर धूर निघतो आणि यज्ञ पेट घेतो. आहे कि नाही जादू!!

Educational Topics

27 फेब्रुवारी-मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस ‘मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

२७ फेब्रुवारी १९१२- १० मार्च १९९९) एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार. पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने काव्यलेखन. जन्म पुणे येथे. नासिक येथे शिक्षण. बी. ए. झाल्यावर १९३४ ते १९३६ या काळात ते चित्रपटव्यवसायात होते. पुढे १९४९ पर्यंत पुणे, मुंबई व नासिक येथील विविध नियतकालिकांत संपादक म्हणून त्यांनी काम केले. नंतर ते नासिकला स्थायिक झाले. काही पाठ्यपुस्तकांचे संपादनही त्यांनी केले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी सत्याग्रह केला होता. कुसुमाग्रज जीवनलहरी (१९३३), विशाखा (१९४२), किनारा (१९५२), मराठी माती (१९६०), स्वगत (१९६२), हिमरेषा (१९६४) व वादळवेल (१९७०) हे त्यांचे काही प्रकाशित काव्यसंग्रह. विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे.

काव्यसंग्रह
कवीच्या क्रांतिप्रवण मनोवृत्तीचा, विजिगीषू मानवतेचा व ध्येयवादी प्रीतीचा भव्योदात्त कल्पनाचित्रांनी व संपन्न शब्दकळेने केलेला स्फूर्तिदायक आविष्कार त्यातील विविध कवितांतून आढळतो. ‘अग्निसंप्रदायी काव्य’ या नावाने विशाखेची एक परंपराच नंतर मराठी काव्यात निर्माण झाली. त्यांची कविता संघर्षातून अवतरते. विशाखानंतरची त्यांची कविता अधिक अंतर्मुख होऊन सामाजिक संघर्षाबरोबरच मानसिक व तात्त्विक संघर्षाकडे वळली. वाढत्या वयाबरोबर कवीच्या अंतर्जीवनाशी सतत एकरूप होऊन वाढत जाणारी कविता दुर्मिळ असते. कुसुमाग्रजांचे काव्य या अर्थाने मराठीच अनन्यसाधारण आहे.
केशवसुतांच्या क्रांतिकारक काव्याशी त्याचे नाते आहे. आधुनिक काव्य हा कुसुमाग्रजांच्या चिंतनाचाही विषय असून त्यांनी काही मार्मिक काव्यसमीक्षात्मक निबंधही लिहिले आहेत. शिरवाडकरांच्या स्वतंत्र नाटकांत दुसरा पेशवा (१९४७), कौंतेय (१९५३), आमचं नाव बाबुराव (१९६६), ययाति आणि देवयानी (१९६६), वीज म्हणाली धरतीला (१९७०), नटसम्राट (१९७१) यांचा समावेश होतो. दूरचे दिवे (१९४६), वैजयंती (१९५०), राजमुकुट (१९५४), ऑथेल्लो (१९६१) व बेकेट (१९७१) ही त्यांची नमुनेदार रूपांतरित नाटके आहेत. प्रकृतीने गंभीर व रचनाशिल्पाच्या दृष्टीने रेखीव व निर्दोष असलेल्या त्यांच्या नाटकांत प्रभावी व्यक्तिमत्त्वांच्या अंतःकलहाचे सखोल दर्शन घडते. मार्मिक नाट्यदृष्टी, काव्यात्म भाषाशैली व स्वतंत्र आशयानुकूल रचनातंत्र या गुणामुळे प्रयोगदृष्टीनेही त्यांची नाटके यशस्वी झाली आहेत.
१९७४ मध्ये त्यांच्या नटसम्राट ह्या नाटकला साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले. वैष्णव (१९४६), जान्हवी (१९५२) व कल्पनेच्या तीरावर (१९५६) या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांच्या कथासंग्रहांत फुलवाली (१९५०), सतारीचे बोल आणि इतर कथा (१९६८), काही वृद्ध, काही तरुण (१९६१), प्रेम आणि मांजर (१९६४) व निवडक बारा कथा (१९६८) यांचा अंतर्भाव होतो. काव्यात्मता व विचारप्रेरकता हे त्यांच्या कथासाहित्याचे विशेष होत. कालिदासाच्या मेघदुताचे मराठी रूपांतर (१९५६), समिधा (१९४७) हा मुक्तकाव्यांचा संग्रह, आहे आणि नाही (१९५७) हा लघुनिबंधसंग्रह तसेच काही बालकथा व बालगीते यांचाही समावेश त्यांच्या लेखनात होतो. अन्य मराठी कवींचे काही काव्यसंग्रहही त्यांनी संपादित केले आहेत.
१९६४ मधील गोव्याच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते

Educational Topics

परीक्षा कालावधीत मुलांनी घ्यावयाची खबरदारी

परीक्षेचेच्या अगोदरच्या दिवशी

1) पूर्ण प्रकरण न वाचता नोट्सची उजळणी करा.
2) नवीन काही वाचू नका.
3) संकेत शब्द,सूक्ष्म टिपणे,आकृत्या,नकाशे,तक्ते यांचे धावते निरीक्षण करा.
4) झोप पूर्ण व सलग घ्या.जागरण टाळा.
5) पहाटे पासूनच शांत व उत्साही वातावरणात अभ्यासाला सुरुवात करा.
6) परीक्षेला लागणाऱ्या आवश्यक साहित्याची जमवाजमव करा.सर्व साहित्य एकाच ठिकाणी ठेवा.
7) कपड्यांना इस्त्री व बुटाला पाँलीस करुन ठेवा.

*परीक्षेला निघताना*….
8) परीक्षेला निघताना आवश्यक सर्व साहित्य सोबत घ्या. ओळखपत्र,हाँल तिकीट,पेन(किमान तीन),पेन्सिल,शार्पनर,स्केल,लाँगरिथम,कंपासबाँक्स,खोडरबर,पँड, पाण्याची बाटली,रुमाल,घड्याळ,गरजेनुसार रुपये सोबत ठेवावेत.
9) हलका आहार घ्यावा.(साधी पोळी,भाजी,वरणभात). पोटभर न खाता थोडी भूक शिल्लक ठेवा.
10) रस्त्यातील वाहतूक,ट्रँफिक जँमचा विचार करुन योग्य वेळेत निघा.
11) सायकलने प्रवास करत असाल तर रुमाल/टोपी वापरा.मोटर सायकलने जात असाल तर हेल्मेट अवश्य घाला.
12) परीक्षेच्या अर्धा तास सेंटरवर पोहचा.

*परीक्षा हाँलमध्ये*
13) परीक्षा हाँल मध्ये प्रश्नपत्रिका हातात पडेपर्यंतचा संपूर्ण काळ मानसिक दृष्ट्या महत्त्वाचा असतो हे लक्षात ठेवा.यासाठी…..
14) मन स्थिर ठेवा.जो अभ्यास आपण केलेला आहे,तेवढे आपण निश्चितपणे लिहू शकतो यावर विश्वास ठेवा.
15) मागे काय झाले,पुढे काय होईल याची चिंता न करता शांत बसा.कोणतीच प्रश्नोत्तरे आठवण्याचा प्रयत्न करु नका.

*परीक्षा देताना*…..
16) खूप सोपे प्रश्न असतील तर खूप घाई करु नका.त्यामुळे Skill Mistakes होतात.हे लक्षात ठेवा.
17) अवघड प्रश्न असेल तरी घाबरू नका.त्याला सामोरे जा.तुम्हाला ते अवघड वाटत असतील तर ते ईतरानाही अवघड असतात.त्यातल्या त्यात जो धिराने त्या प्रश्नाला सामोरे जातो,उतर लिहण्याचा प्रयत्न करतो तो अधिक गुण मिळवतो.जो त्याचा ताण घेतो तो अधिक चूका करतो.
18) कसाही प्रश्न असेल तरी मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करीन.शेवटच्या आत्मविश्वासाने मी पेपर लिहीन असा निर्धार सातत्याने करा.
19)चुकूनही काँपी करु नका, कोणी आग्रह करत असेल तरीही करु नका.इतर विद्यार्थी काँपी करतात तेव्हा आपल्याला वाटते,की ते आपल्या पुढे जातील; पण अशा मुलांचा पाया कच्चा असल्याने ते भविष्यात मागे पडतात.त्यामुळे तुम्ही प्रामाणिक प्रयत्नांनी पुढे जा.

*उत्तरप्रत्रिका सोडविताना*…..
20) सुवाच्च अक्षरात आपला परीक्षा क्रमांक ,दिनांक,केंद्र अशी सर्व माहिती अचूक भरा.
21) बारकोड चिकटवण्यापूर्वी आपलाच असल्याची खात्री करा.
22) उत्तरप्रत्रिके मध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा.
23) प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक वाचा.
25) निळ्या किंवा काळ्या शाईच्याच पेनचा करा.
26)सोपे प्रश्न लक्षात घ्या.प्रश्नांची निवड महत्त्वाची असते.
27) विचारले तेच व तेवढेच लिहा.पेपर दिलेल्या वेळेत पूर्ण होतो .
28) प्रश्नांचा क्रमांक अथवा उपप्रश्न क्रमांक ठळक अक्षरात ठेवा.
29) उत्तराचा आराखडा मनात तयार करा.
30) हिंमत …हौसला बुलंद ठेवा.
31) उत्तरप्रत्रिकेवर कोठेही डाग पाडू नका.परीक्षकांसाठी सूचना लिहू नका.

*पेपर झाल्यावर*…
32) पेपर नंतर उतरांबाबत मित्रांसोबत र्चचा टाळा.
33) किती गुण मिळतील यांची बेरीज करीत बसू नका.
34) काही उत्तरे चुकली असल्यास त्यांचा विचार न करता जे बरोबर लिहले आहे,त्यावर समाधानी राहण्याचा प्रयत्न करावा.
35) झालेल्या पेपरची चिंता न करता पुढच्या पेपरची तयारी सुरू करा.

From:
SARANG KANHOR
MO. NO. 8585010520

Educational Topics

सफलता की राह –

असफलता से सीखे कैसे सफलता मिल सकती है ,अगर आपने असफल होने का कारण ज्ञात कर लिया और सफलता की खोज मे लग गऐ तो आपको कोई भी सफल होने से नही रोक सकता है फिर वह कैसा भी कार्य क्यो न हो ,अगर आप कोई गलती करते हो तो उसे जरूर अपनी डायरी मे नोट करें ,क्योकि यही वह प्रश्न है जो आगे आपकी सफलता के पेपर मे आने वाला है,अगर आप ऐसा करते है तो आपको सफल होने से कोई नही रोक सकता है
,असफलता से कैसे निपटा जा सकता है इस पर विचार जरूर करें ।
जब कभी भी आपको असफलता का सामना करना पड़े, आप कुछ इन पहलुओं पर गौर कर सकते हैं:

१ .इस बात को मान लें की जीवन के लिए सार्थक चीज़ें बहुत आसानी से कभी नहीं मिलेंगी। जितना बड़ा आपका लक्ष्य है मेहनत भी उसी के अनुसार हो ।

२-जब आप सफल होने वाले होगें तो लोग अब आपको नीचा दिखाने की कोशिश करेंगे। उनका सामना करने के लिए तैयार हो जाइए। उनकी बातों को नज़र अंदाज़ करना सीखिए।

३-असफलता हमें कुछ पाठ सिखाती हैं, जो हमें सफल होने में मदद कर सकते हैं। उस पाठ को समझें।
दोस्तों और परिवार के साथ समय बिताइए, उनसे राय लीजिए। आप अपने से छोटे (कम उम्र ) के लोगों से भी सलाह ले सकते है ,

४-ऐसे लक्ष्य बनाइए जो ना केवल आपकी क्षमता के अनुरूप हो बल्कि आपकी परिस्थिति के भी अनुसार हो।
सोशल मीडिया में झूठी खुशी न तलाशें। वहाँ लोग सिर्फ़ अपना सकारात्मक चेहरा ही दिखाते हैं, जो सच्चाई से बहुत दूर होता है। असल ज़िंदगी में प्रेरणा ढूँढें।
५- जो काम आप करने जा रहे हो उसके बारे मे जो लोग काम कर के सफल हुए उन व्यक्तियों की किताबे जरूर पढे़ ।
६-कभी भी अपना आत्मविश्वास कम न होने दें।
इंजी० वीरू धनोलिया
(7415332535)

Educational Topics

MPSC चा पहिला अटेम्प्ट देणाऱ्यांसाठी खास… – MPSC 1 वर्ष आणी मी

शाळेत नेहमीच active and all rounder आसल्यामूळे आई वडीलांनी बालपणापासून माझ्यावर विश्वास ठेवला व मला स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न दाखविले . 2012 ला दहावीत 90% मिळाले ठरविलेल्या Fergusson college मध्ये Arts stream साठी admission भेटले. माझ्या संपूर्ण school batch मध्ये arts साठी जाणारी मीच. 2014 साली बारावीत 91% आले तेव्हा भविष्याची दिशा आधिकच स्पष्ट झाली. 1st & 2nd year खूपच experiments केले मुख्यता academics पेक्षा skills n personality enrichment यातच गेले.

परंतु last year च्या सुरूवातीस पक्का निरधार केला आणि 2017 ला last year लाच असताना attempt देण्याचे decide केले.

साधारणपणे May महिन्यात अभ्यास सुरू झाला. यशस्वी candidates चे guidance घेतले syllabus,book list,previous years question papers हे सर्व घेऊन घरी अभ्यास सुरु केला. पाहता पाहता 8-9 months दररोज 8-10 तास अभ्यास झाला. अर्थात मधून अधून college ला ही जावेच लागले.
1st exam january 2017 ची STI prelims. नंतर March 2017 ची PSI April महिन्यात राज्य सेवा pre May 2017 excise prelims हे सर्व exams final year चे papers देण्याचा आगोदरच pass झाले त्यामुळे आभ्यासा पेक्षा confidence level खूप high झाली. त्यामुळे अभ्यास खूप उत्साहाने झाला. रात्री खूप समाधानाची झोप ययची व next day अजून excitement मधे आभ्यास होत होता. Graduation चे papers दिल्यावर mains चे preparation केले. सर्व mains झाले score अपेक्षित आले . 2017 मी MPSC च्या 11 exam दिले व सर्व 11 exam pass होण्याचा योग आला. State services Final result मध्ये Naib tahshildar ची post वयाच्या 21 व्या वर्षी भेटली.

आता यात सर्वात महत्त्वाचे competitive exam मधे स्वतःला लहान समजत बसने 1st attempt ला lightly घेणे, अभ्यास कमी झाला म्हणून demotive होत बसणे म्हणजे यशा पासून लांब जाणे.

जी energy level अभ्यास सुरू करताना असते तिच last day पर्यत maintain करणे हेच खरे challenge. अभ्यास खूप interesting आहे मन लाऊन केला तर यश नक्कीच मिळते. फक्त प्रामाणिक राहा. मग आयुष्यात नक्कीच worth remembering असा हा challenging प्रवास ठरेल. Trust your ability & judge the competition properly.

― पूजा गायकवाड (उपजिल्हाधिकारी 2018)

(This is especially for new aspirants who have maximum hopes of clearing exam in first attempt)
————-–——————————–