शाळेत दाखवण्याजोग्या अंधश्रद्धा निर्मूलन करता येईल अशा शास्त्रीय पध्दती.

काळीजादू

१.जादू कुंकू काळे करण्याची

शिक्षीत लोकांनी आपल्या शिक्षणाचा व विज्ञानाचा उपयोग करून अंधश्रद्धेचे निर्मुलन केले पाहिजे अर्धा लहान चमचाभर कुंकूवात निरमा पावडर घ्या निरमा पावडरात अल्कली असते आणि कुकंवात अल्कली मिळताच काळे होते नेमके हिच कृती करून बुवालोक स्त्रियांना घाबरवून त्यांच्या मनात भीती निर्माण करतात.

२.जादू हळदीचे कुंकू करण्याची

बाबा लोक हळदीमध्ये थोडा प्रमाणात आधीच निरमा पावडर मिसळून ठेवतात निरमा पावडर अल्कली असते आणि अल्कली मुळे हळद लाल होते नेमके हिच कृती करून बाबालोक भोळ्या भाबड्या स्त्रियांना घाबरवून फसवितात.

३.वस्तू गोड करणे

सॅकरीन साखरेपेक्षा कित्येक पटीने गोड असते बाबा लोक ज्या ही वस्तूला हात लावतील ती वस्तू गोड होते तिर्थ गोड होते यासाठी बाबा लोकांनी सॅकरीनच्या गोळ्यांची पावडर आधीच हाताच्या बोटाला चोळली असते बिचारे भक्त यापासून अनभिज्ञ असतात आणि याच गोष्टीचा फायदा बाबा उचलतात.

४.लिबांतून रक्त काढणे

साहित्य–एक लिबूं चाकू मिथील ऑरेंज च द्रावण चाकुच्या पात्याला मिथील ऑरेंजच द्रावण लावावे थोड्या वेळाने त्या चाकुणे लिबूं कापल्यास लाल रक्ताप्रमाणे रस बाहेर येतो ही कृती तुम्ही कोणत्याही मंत्र न म्हणता करू दाखवू शकतात व लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करू शकता

५.ताब्यांचे भांडे वर उचलणे

ताब्यांचे लोटी घ्या.(भरणे) ते काठोकाठ तांदूळाणे भरूण घ्या त्यामध्ये एक साधारण मोठा पेचकस घेवून तो 4ते5 वेळा टोचा तांदूळाचे दाणे हवा निघून गेल्यावर एकदम फिट होतात तेव्हा पेचकस वर उचलूण घ्या ताब्यां वर उचलला जाईल.

६.रसाने भरलेल्या लिंबूतून अग्नीच्या ज्वाळा निघणे.

चाकूच्या टोकास सोडीयम धातू घासून ठेवा. आता लिंबू डाव्या हातात घेऊन मुठीजवळील चाकूच्या पात्याने तो अर्ध्यापेक्षा जास्त कापा व चाकू अलगद बाहेर काढत फट बंद करा. लिंबावर दाब देत फट मोठी करताच अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडतील.
यात लिंबाच्या रसाचा सोडीयमशी संयोग होऊन हायड्रोजन मुक्त होतो. हायड्रोजन चटकन पेट घेतो व सोडीयम पिवळ्या रंगाने जळतो. म्हणून हि ज्योत आपल्याला चमकदार पिवळ्या रंगाची दिसते. फक्त लिंबू कापताना शरीरापासून दूर ठेवा.

७.पाण्याने दिवा कसा पेटू शकतो.

एका दिव्यात पाणी घ्या. त्यात कॅल्शिअम कार्बाईडचे छोटे खडे टाका आणि पेटवा. दिवा आपोआप पेटेल. हे कसे झाले?
जेव्हा आपण पाण्यात कॅल्शिअम कार्बाईडचे खडे टाकतो तेव्हा त्यांची पाण्यावर अभिक्रिया होऊन ‘अॅसिटिलीन’ वायू तयार होतो जो ऑक्सीजनच्या सानिध्यात जळतो व पांढरी शुभ्र ज्योत तयार होते. आणि लोकांना वाटतं दिवा पाण्याने पेटला. तुम्हीसुद्धा करून पहा हे खडे तुम्हाला एखाद्या वेल्डरकडे सहज उपलब्ध होतील. मग कधी पेटवणार ‘पाण्याने’ दिवा..?

८.आपोआप त्या मेणबत्त्या पेटणे.

मित्रांनो चमत्कार सोपा आहे पण खूप काळजी घ्यावी लागेल.
तुम्हाला पिवळा फॉस्फरस व कार्बनडाय सल्फाईडचं द्रावण वापरायचं आहे. पिवळ्या फॉस्फरसचा ज्वलनांक केवळ ३४॰ से. असल्याने तो सामान्य तापमानातही लगेच पेट घेतो हे आपण दहावीत शिकलोय. तर या फॉस्फरसला कार्बनडाय सल्फाईडमध्ये विरघळवा. आणि तयार झालेल्या द्रावणात मेणबत्तीची वात भिजवा. कार्बनडाय सल्फाईड बाष्पनशील असल्याने तो हवेत उडून जातो व वातीवर फक्त पिवळा फॉस्फरस रहातो.. त्याच्या कणांना हवा लागली कि तो लगेच पेट घेतो पर्यायाने वातसुद्धा सहज पेट घेते आणि तुम्ही चमत्कारी बाबा ठरता.

९.लिंबातून अक्षरश: ज्वाळा निघू लागणे.

एक चाकू घ्या. चाकूच्या टोकास सोडीयम धातू घासून ठेवा. आता लिंबू डाव्या हातात घेऊन मुठीजवळील चाकूच्या पात्याने तो अर्ध्यापेक्षा जास्त कापा व चाकू अलगद बाहेर काढत फट बंद करा. लिंबावर दाब देत फट मोठी करताच अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडतील.
यात लिंबाच्या रसाचा सोडीयमशी संयोग होऊन हायड्रोजन मुक्त होतो. हायड्रोजन चटकन पेट घेतो व सोडीयम पिवळ्या रंगाने जळतो. म्हणून हि ज्योत आपल्याला चमकदार पिवळ्या रंगाची दिसते. फक्त लिंबू कापताना शरीरापासून दूर ठेवा.

१०.अग्नीशिवाय यज्ञ पेटवणे.

या चमत्कारात मांत्रिक बाबा यज्ञाची सर्व सामग्री यज्ञकुंडात टाकतो पण आपल्या नकळत त्यासोबत नारळाची बुरी आणि कागदाचे तुकडेही टाकतो. मंत्राचा जाप करत तो त्यावर यज्ञात टाकावयाची विभूती व गायीचे तुप सोडतो आणि काय चमत्कार यज्ञ आगपेटीशिवाय आपोआप पेटतो आणि आपण धन्य होऊन बाबाला शरण जातो.
पण मित्रांनो खरी गंमत इथेच आहे मंत्र म्हणताना बाबा जी विभूती त्या न पेटलेल्या यज्ञावर टाकतो ती Potassium Permanganate (KMno4) ची बारीक पावडर असते व ती दिसायला काळी असल्याने कुणाला संशयही येत नाही. आणि गायीचे शुद्ध तुप हे ग्लिसरीनचे काम करते. ज्यावेळेस बाबा हे तुप त्या बुक्कीवर सोडतो तेव्हा Potassium permanganate वर ग्लिसरीनची प्रक्रिया होऊन निळसर धूर निघतो आणि यज्ञ पेट घेतो. आहे कि नाही जादू!!

शिक्षक मेगाभरती-2019: प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील १०,००१ शिक्षकांची होणार भरती

पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिध्द

प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक भरतीसाठी तयार करण्यात आलेल्या पवित्र पोर्टलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिध्द.

👉 १०,००१ शिक्षकांची होणार भरती

☑️ अनुसूचित जाती- १७०४
☑️ अनुसूचित जमाती- २१४७
☑️ अनुसूचित जमाती (पेसा)- ५२५
☑️ व्हिजेए- ४०७
☑️ एनटी-बी- २४०
☑️ एनटी-सी- २४०
☑️ एनटी-डी- १९९
☑️ इमाव- १७१२
☑️ इडब्ल्यूएस- ५४०
☑️ एसबीसी- २०९
☑️ एसईबीसी- ११५४
☑️ सर्वसाधारण- ९२४

👉 सुमारे ५००० च्या वर शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे समायोजनात रिक्त जागा कमी. सहा जिल्ह्यांच्या बिंदूनामावलीची फेरतपासणी केल्यानंतर या जागा त्वरीत भरल्या जातील, तोपर्यंत ५० टक्के तिथल्या जागा भरल्या जातील.

👉 पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचारविरहीत ही पहिलीच शिक्षक भरती होणार. यातून भरतीच्या वेळी होणारे शिक्षकांचे शोषण थांबविण्यात शासनाला यश आले आहे. विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमध्ये अर्ज करताना पोर्टलवरील माहिती शांतपणे वाचावी, कोणीही गोंधळून जाऊ नये, त्यामुळे त्यात कमीत कमी त्रुटी राहतील. अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती आता सुरु होत असल्याचे शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी सांगितले.

👉शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर सध्या संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांना उपलब्ध होईल.

👉२ मार्च रोजी शिक्षकभरतीची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द होणार, त्याच वेळी पवित्र पोर्टलवर सदर जाहिरात उमेदवारांना पहावयास मिळणार आहे.

मराठी एक वैज्ञानिक भाषा आहे. तिचं कोणतंही अक्षर असं का आहे?

क, ख, ग, घ, ङ – यांना कंठव्य म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना ध्वनि कंठातून निघतो.एकदा करून बघा.

च, छ, ज, झ,ञ- यांना तालव्य म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना जीभ टाळू ला लागते.
एकदा करून बघा

ट, ठ, ड, ढ , ण- यांना मूर्धन्य म्हणतात.कारण यांचा उच्चार जीभ मूर्धा ला लागल्याने होतो.एकदा म्हणून बघा.

त, थ, द, ध, न- यांना दंतव्य म्हणतात.यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते.
एकदा म्हणून बघा.

प, फ, ब, भ, म,- यांना *ओष्ठ्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार ओठ जुळल्याने होतो. एकदा म्हणून बघा .
_____________________________

आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान वाटतो पण तो का , ते पण लोकांना सांगा.एवढी वैज्ञानिकता इतर कुठल्या ही भाषेत नसेल.

जय मराठी !
क,ख,ग काय म्हणतात बघू जरा ….
•••••••••••••••••••••••••••••••••••
क – क्लेश करू नका
ख- खरं बोला
ग- गर्व नको
घ- घमेण्ड करू नका
च- चिँता करत राहू नका
छ- छल-कपट नको
ज- जवाबदारी निभावून न्या
झ- झुरत राहू नका
ट- टिप्पणी करत राहू नका
ठ- ठकवू नका
ड- डरपोक राहू नका
ढ- ढोंग करू नका
त- तंदुरुस्त रहा
थ- थकू नका
द- दिलदार बना
ध- धोका देऊ नका
न- नम्र बना
प- पाप करू नका
फ- फालतू कामे करू नका
ब- बडबड कमी करा
भ- भावनाशील बना
म- मधुर बना
य- यशस्वी बना
र- रडू नका
ल- लालची बनू नका
व- वैर करू नका
श- शत्रुत्व करू नका
ष- षटकोणा सारखे स्थिर रहा
स- सत्य बोला
ह- हसतमुख रहा
क्ष- क्षमा करा
त्र- त्रास देऊ नका
ज्ञ- ज्ञानी बना !!
मराठी बोला अभिमानाने

20 लाख रोजगार, 3 लाख 36 हजार कोटींचा एफडीआय, महाराष्ट्राचं बजेट सादर

महाराष्ट्राचा 2019-20 वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत, तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अंतरिम अर्थसंकल्प मांडला. आगामी निवडणुकांमुळे राज्यात अंतरिम अर्थसंकल्प मांडला गेला. जून-जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

✍️_ महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

✍- 4666 किमी लांबीपासून 21,473 किमी राष्ट्रीय महामार्ग बांधले. साडेचार वर्षात 13 हजार किमीचा महामार्ग बांधले.
✍- मुंबई मेट्रोचे जाळे 11.4 किमीपासून 276 किमीपर्यंत विस्तारित झाले
✍- राज्यातील महत्त्वाच्या आणि लहान शहरात विमानसेवेचे जाळे पसरवले जात आहे
✍- देशातील रोजगार निर्मितीत महाराष्ट्राचा 25 टक्के वाटा, म्हणजे 20 लाख 60 हजार तरुणांना नोकऱ्या
✍- अरबी समुद्रातील शिवस्मारकाची कारवाई सुरु झाली असून भविष्यातही निधी कमी पडू दिला जाणार नाही
✍- कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी 3 हजार 498 कोटींचा नियतव्यय प्रस्तावित.
✍- राज्यातील कृषिपंप जोडणीसाठी 90 कोटी
✍- एक लाख सौर पंप बसवण्याचे उद्दिष्ट
✍- 151 दुष्काळग्रस्त तालुके आणि 268 महसूल मंडळे, 5449 दुष्काळी परिस्थिती असलेल्या गावात मदत पोहचवणार.
✍- 10 टक्के सवर्ण आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करणार
✍- 8500 कोटी सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत रस्त्यांसाठी प्रस्तावित
✍- हायब्रीड एनयूटी अंतर्गत 3 हजार 500 कोटी मंजूर
✍- अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीजनिर्मिती करण्यावर भर. यंदा 1 हजार 87 कोटींची तरतूद.
✍- समृद्धी महामार्गासाठी 7 हजार कोटींचं भूसंपादन पूर्ण
✍- मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत 30 हजार किमीचे उद्दिष्ट, यापैकी 22 हजार किमीचे रासत्व मंजूर
✍- मुंबई किनारपट्टीवर रोरो सेवा बांधण्याचे काम प्रगतीपथावर
✍- नाशिकमध्ये लाईट रेल ट्रान्सपोर्टसाठी काम हाती घेण्यात आले आहे
✍- अमरावती, गोंदिया, नाशिक, चंद्रपूर, जळगांव, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विमानतळ विकास मोहिम वेगात.
✍- सुमारे 67 लाख प्रवासी रोज प्रवास करतात त्या एसटीच्या विकासाचा निर्धार. 96 बसस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी 270 कोटी खर्चाला मान्यता. बसेसची खरेदी प्रक्रियाही वेगात.j
✍- हायब्रीड ॲन्युईटी तत्त्वावर रस्त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी यंदा 3 हजार 700 कोटींचा नियतव्यय प्रस्तावित.
✍- मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र, मेक इन इंडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रात 3 लाख 36 हजार कोटींची थेट परदेशी गुंतवणूक.
✍- प्रस्तावित 42 माहिती तंत्रज्ञ उद्यानांतून 1 हजार 500 कोटींची गुंतवणूक अपेक्षित. त्यातून 1 लाख रोजगार निर्मितीची शक्यता.
✍- ‍ग्रामीण विकासात सहाय्यभूत ठरणाऱ्या सहकारी संस्थांच्या कृषी व कृषीपूरक व्यवसायाला सहाय्य करण्यासाठी 500 कोटींच्या अनुदानाची तरतूद.
✍- इलेक्ट्रॉनिक धोरणांतर्गत 18 प्रकल्प प्रगती पथावर. 6 हजार 300 कोटींची गुंतवणूक. 12 हजार रोजगार निर्मिती अपेक्षित.
✍- शेतकरी, उद्योजक, यंत्रमागधारकांना द्यावयाच्या वीजदर सवलतीसाठी यंदा 5 हजार 210 कोटींची तरतूद.
✍- ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती’ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र ठरण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा आता आठ लाख रुपये असेल.
✍- मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना आणि राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमासाठी राज्याचा वाटा म्हणून 750 कोटी रुपयांची तरतूद.
✍- स्मार्ट सिटी अभियानात पुणे, सोलापूर, कल्याण-डोंबिवली, नागपूर, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, पिंपरी-चिंचवड या 8 शहरांसाठी यंदा दोन हजार 400 कोटींची तरतूद.
✍- पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 385 शहरात नागरिकांना लाभ होणार असून 2019 – 20, 6895 कोटी देणार

✍- गड किल्ले संवर्धनासाठी रायगड विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय
✍- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे भागभांडवल 400 कोटींनी वाढवणार.
✍- 4 लाख 14 हजार कोटींचे कर्ज सध्या राज्यावर आहे
✍- राज्याचं कर्ज 16 टक्क्यांवरुन 14 टक्क्यांवर आणलं

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

कवी – सुरेश भट

PTET 2019 : 12वीं उत्तीर्ण अभ्यर्थी भी कर सकेंगे बीएड, जानें योग्यता और पूरी प्रक्रिया

राजस्थान पीटीईटी -2019 की परीक्षा डूंगर कॉलेज, बीकानेर के द्वारा आयोजित की जा रही है। राजस्थान पीटीईटी 2019 की परीक्षा इस वर्ष बड़े स्तर पर आयोजित की जा रही है।क्योंकि इस वर्ष ग्रेजुएट स्टूडेंट्स के साथ बारहवीं पास छात्र भी राजस्थान पीटीईटी 2019 के लिए आवेदन कर सकते हैं। राजस्थान पीटीईटी 2019 में ग्रेजुएट उम्मीदवारों को 2 वर्ष के बीएड कोर्स के साथ ही साथ 12वीं उम्मीदवार 4 वर्ष का इंटीग्रेटेड कोर्स बीए, बीएड, बीएससी, बीएड के लिए आवेदन कर सकते हैं। प्री-बीएड 2019 के लिए आवेदन आधिकारिक वेबसाइट ptet2019.org पर जाकर कर सकते हैं। उम्मीदवार राजस्थान पीटीईटी 2019 के लिए 18 मार्च 2019 तक ही आवेदन कर सकते हैं उसके बाद किसी भी तरह आवेदन स्वीकार्य नहीं होंगे। राजस्थान के सामान्य ज्ञान और विषय पर अच्छी पकड़ रखने वाला उम्मीदवार अन्य से बेहतर अंक हासिल कर पाएगा।

*How To Apply For PTET 2019*

परीक्षा के लिए आवेदन करने के लिए आपको ptet2019.org की आधिकारिक वेबसाइट पर लोग इन करना होगा। अब आपके ईमेल आईडी के साथ ही आपके संपर्क नंबर जैसे विवरण रजिस्टर करें। उसके बाद आवेदकों को क्रेडेंशियल विवरण प्रदान किया जाएगा, विवरण भरने के बाद कोई आवेदन फॉर्म का उपयोग कर सकता है। आवेदन विवरण फॉर्म को सही ढंग से दर्ज काने के लिए सुनिश्चित करें। आवेदन पत्र भरते समय अपने स्कैन किए गए सस्ताक्षर के साथ साथ फोटो भी अपलोड करें। भुगतान विवरण आवेदन पत्र के साथ प्रस्तुत किए जाने की आवश्यकता है। फीस का भुगतान करने के बाद फॉर्म सावधानी से जांचना होगा। .सब्मिट बटन पर क्लिक करें अधिक उपयोग केलिए प्रपत्र की एक प्रतिलिपि अपने पास जरूर सुरक्षित रख लें।

ई-मित्र कियोस्क या जन सुविधा केंद्र के माध्यम से ऑनलाइन फॉर्म भरा जा सकता है। सेवा प्रदाता को इसके लिए 20 रूपए आवेदन पत्र और 10 रूपए परीक्षा शुल्क जमा कराने के लिए देने होंगे। आवेदन पत्र की हार्ड कॉपी और आवश्यक प्रमाण पत्रों की सत्यापित कॉपी अपने पास सुरक्षित संभाल कर रखें

*PTET 2019 Exam Syllabus*

इस परीक्षा में प्रवेश परीक्षा के लिए 3 घंटे का समय मिलेगा। इसमें कुल 200 प्रश्न आएंगे। सभी प्रश्न ऑब्जेक्टिव टाइप होंगे। राजस्थान पीटीईटी -2019 परीक्षा में कोई नेगेटिव मार्किंग नहीं होगी। प्रश्न पत्र में चार भाग होंगे। हर एक भाग में 50 प्रश्न आएँगे। उम्मीदवार के अधिकतम अंक 600 होंगे। इस परीक्षा में उम्मीदवारों को उत्तीर्ण होना होगा। परीक्षा में आए अंक के मुताबिक उम्मीदवारों को बीएड कॉलेज में दाखिला मिलेगा।

*PTET 2019 Selection Process*

इस परीक्षा के लिए आवेदन 14 फरवरी 2019 से शुरू हो गए है। उम्मीदवारों को बीएड राजस्थान 2019 कोर्स के लिए लिखित परीक्षा पास करनी होगी। यह लिखित परीक्षा प्रवेश परीक्षा के रूप में आयोजित की जाएगी, जिसके बाद मेरिट लिस्ट जारी की जाएगी। मेरिट में आने वाले उम्मीदवारों का प्राथमिकता के अनुसार काउंसलिंग जाएगी और इसके बाद उन्हें बीएड कॉलेज में दाखिला दिया जाएगा।

*Eligibility For PTET 2019*

उम्मीदवार द्वारा मान्यता प्राप्त बोर्ड से वरिष्ठ माध्यमिक विद्यालय में पास होना चाहिए। उम्मीदवारों के स्नातक में कम से कम 50 प्रतिशत अंक होने चाहिए। आरक्षित वर्ग को 5 प्रतिशत की छूट दी गई है।

27 फेब्रुवारी-मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस ‘मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

२७ फेब्रुवारी १९१२- १० मार्च १९९९) एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार. पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने काव्यलेखन. जन्म पुणे येथे. नासिक येथे शिक्षण. बी. ए. झाल्यावर १९३४ ते १९३६ या काळात ते चित्रपटव्यवसायात होते. पुढे १९४९ पर्यंत पुणे, मुंबई व नासिक येथील विविध नियतकालिकांत संपादक म्हणून त्यांनी काम केले. नंतर ते नासिकला स्थायिक झाले. काही पाठ्यपुस्तकांचे संपादनही त्यांनी केले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी सत्याग्रह केला होता. कुसुमाग्रज जीवनलहरी (१९३३), विशाखा (१९४२), किनारा (१९५२), मराठी माती (१९६०), स्वगत (१९६२), हिमरेषा (१९६४) व वादळवेल (१९७०) हे त्यांचे काही प्रकाशित काव्यसंग्रह. विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे.

काव्यसंग्रह
कवीच्या क्रांतिप्रवण मनोवृत्तीचा, विजिगीषू मानवतेचा व ध्येयवादी प्रीतीचा भव्योदात्त कल्पनाचित्रांनी व संपन्न शब्दकळेने केलेला स्फूर्तिदायक आविष्कार त्यातील विविध कवितांतून आढळतो. ‘अग्निसंप्रदायी काव्य’ या नावाने विशाखेची एक परंपराच नंतर मराठी काव्यात निर्माण झाली. त्यांची कविता संघर्षातून अवतरते. विशाखानंतरची त्यांची कविता अधिक अंतर्मुख होऊन सामाजिक संघर्षाबरोबरच मानसिक व तात्त्विक संघर्षाकडे वळली. वाढत्या वयाबरोबर कवीच्या अंतर्जीवनाशी सतत एकरूप होऊन वाढत जाणारी कविता दुर्मिळ असते. कुसुमाग्रजांचे काव्य या अर्थाने मराठीच अनन्यसाधारण आहे.
केशवसुतांच्या क्रांतिकारक काव्याशी त्याचे नाते आहे. आधुनिक काव्य हा कुसुमाग्रजांच्या चिंतनाचाही विषय असून त्यांनी काही मार्मिक काव्यसमीक्षात्मक निबंधही लिहिले आहेत. शिरवाडकरांच्या स्वतंत्र नाटकांत दुसरा पेशवा (१९४७), कौंतेय (१९५३), आमचं नाव बाबुराव (१९६६), ययाति आणि देवयानी (१९६६), वीज म्हणाली धरतीला (१९७०), नटसम्राट (१९७१) यांचा समावेश होतो. दूरचे दिवे (१९४६), वैजयंती (१९५०), राजमुकुट (१९५४), ऑथेल्लो (१९६१) व बेकेट (१९७१) ही त्यांची नमुनेदार रूपांतरित नाटके आहेत. प्रकृतीने गंभीर व रचनाशिल्पाच्या दृष्टीने रेखीव व निर्दोष असलेल्या त्यांच्या नाटकांत प्रभावी व्यक्तिमत्त्वांच्या अंतःकलहाचे सखोल दर्शन घडते. मार्मिक नाट्यदृष्टी, काव्यात्म भाषाशैली व स्वतंत्र आशयानुकूल रचनातंत्र या गुणामुळे प्रयोगदृष्टीनेही त्यांची नाटके यशस्वी झाली आहेत.
१९७४ मध्ये त्यांच्या नटसम्राट ह्या नाटकला साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले. वैष्णव (१९४६), जान्हवी (१९५२) व कल्पनेच्या तीरावर (१९५६) या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांच्या कथासंग्रहांत फुलवाली (१९५०), सतारीचे बोल आणि इतर कथा (१९६८), काही वृद्ध, काही तरुण (१९६१), प्रेम आणि मांजर (१९६४) व निवडक बारा कथा (१९६८) यांचा अंतर्भाव होतो. काव्यात्मता व विचारप्रेरकता हे त्यांच्या कथासाहित्याचे विशेष होत. कालिदासाच्या मेघदुताचे मराठी रूपांतर (१९५६), समिधा (१९४७) हा मुक्तकाव्यांचा संग्रह, आहे आणि नाही (१९५७) हा लघुनिबंधसंग्रह तसेच काही बालकथा व बालगीते यांचाही समावेश त्यांच्या लेखनात होतो. अन्य मराठी कवींचे काही काव्यसंग्रहही त्यांनी संपादित केले आहेत.
१९६४ मधील गोव्याच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते