General Topics

उद्योगात अपमानाचा बदला कसा घ्यावा?

टाटांचा पॅसेंजर कार उद्योग तोट्यात जात होता, तो विकण्याचा निर्णय टाटांनी घेतला व तो विकण्याच्या मिटींगसाठी फोर्ड कंपनीस भेटण्यासाठी गेले. तुम्हाला कार बनविताच येत नाही, तर हा उद्योग तुम्ही का केला? अशी अपमानास्पद विचारणा फोर्ड कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यांचे शब्द रतन टाटांना झोंबले व टाटा कार युनिट न विकण्याचा निर्णय घेऊन ते परत आले. बरेच संशोधन व प्रयत्न करून टाटांनी स्वतःचा कार ब्रॅंड मोठ्या उंचीवर पोहचविला. पुढे काही वर्षांनी त्याच फोर्ड कंपनीचा आंतरराष्ट्रीय लक्जरी कार ब्रॅंड जग्वार आणि लँन्ड रोव्हर विकत घेऊन विदेशी कार कंपन्यांना चपराक दिली. अपमानाचे परिवर्तन हे ‘मोटिव्हेशन’मध्ये करावे व त्याचा परिणाम हा उद्योगातील फायद्यात व्हावा, ह्यालाच खरा उद्योग ‘माईंडसेट’ म्हणतात.

चुलत्याबरोबर भांडण झालं की लगेच हाणामाऱ्या, डोकीफोडी, पोलिस केस, कोर्टाला हेलपाटे… ह्या सगळ्याचा परिणाम डॉक्टर, वकील व पोलिसांचा फायदा. आज मराठी माणूस भावभावकी, नातेवाईक यांच्याशी भांडणतंटा, लावलावी, काड्या करणे ह्यात अडकला आहे. बाप बीजेपीत, पोरगा राष्ट्रवादीत, भाऊ मनसेत, सून शिवसेनेत, आई अपक्ष… घरातच बोंबाबोब. प्रत्येकाची तोंडं वेगवेगळ्या दिशेला, कुटुंबातच ही तऱ्हा, मग भावकी व गावकी तर विचारूच नका. वकिलांनी भावकीतल्या भांडणावर बंगले बांधले, स्लॅब टाकले, गाड्या घेतल्या. राग येणे, अपमान वाटणे हे स्वाभाविक आहे, पण त्याचा बदला मोठे यश प्राप्त करून घ्यावा. लग्न पत्रिकेत नाव टाकले नाही म्हणून मारामाऱ्या होतात, त्यापेक्षा तुम्ही एवढे मोठे यश मिळवा की तुमचा अपमान करणाऱ्याच्या मनाला लाज वाटली पाहिजे.

महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.

General Topics

उद्योगात अपमानाचा बदला कसा घ्यावा?

टाटांचा पॅसेंजर कार उद्योग तोट्यात जात होता, तो विकण्याचा निर्णय टाटांनी घेतला व तो विकण्याच्या मिटींगसाठी फोर्ड कंपनीस भेटण्यासाठी गेले. तुम्हाला कार बनविताच येत नाही, तर हा उद्योग तुम्ही का केला? अशी अपमानास्पद विचारणा फोर्ड कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यांचे शब्द रतन टाटांना झोंबले व टाटा कार युनिट न विकण्याचा निर्णय घेऊन ते परत आले. बरेच संशोधन व प्रयत्न करून टाटांनी स्वतःचा कार ब्रॅंड मोठ्या उंचीवर पोहचविला. पुढे काही वर्षांनी त्याच फोर्ड कंपनीचा आंतरराष्ट्रीय लक्जरी कार ब्रॅंड जग्वार आणि लँन्ड रोव्हर विकत घेऊन विदेशी कार कंपन्यांना चपराक दिली. अपमानाचे परिवर्तन हे ‘मोटिव्हेशन’मध्ये करावे व त्याचा परिणाम हा उद्योगातील फायद्यात व्हावा, ह्यालाच खरा उद्योग ‘माईंडसेट’ म्हणतात.

चुलत्याबरोबर भांडण झालं की लगेच हाणामाऱ्या, डोकीफोडी, पोलिस केस, कोर्टाला हेलपाटे… ह्या सगळ्याचा परिणाम डॉक्टर, वकील व पोलिसांचा फायदा. आज मराठी माणूस भावभावकी, नातेवाईक यांच्याशी भांडणतंटा, लावलावी, काड्या करणे ह्यात अडकला आहे. बाप बीजेपीत, पोरगा राष्ट्रवादीत, भाऊ मनसेत, सून शिवसेनेत, आई अपक्ष… घरातच बोंबाबोब. प्रत्येकाची तोंडं वेगवेगळ्या दिशेला, कुटुंबातच ही तऱ्हा, मग भावकी व गावकी तर विचारूच नका. वकिलांनी भावकीतल्या भांडणावर बंगले बांधले, स्लॅब टाकले, गाड्या घेतल्या. राग येणे, अपमान वाटणे हे स्वाभाविक आहे, पण त्याचा बदला मोठे यश प्राप्त करून घ्यावा. लग्न पत्रिकेत नाव टाकले नाही म्हणून मारामाऱ्या होतात, त्यापेक्षा तुम्ही एवढे मोठे यश मिळवा की तुमचा अपमान करणाऱ्याच्या मनाला लाज वाटली पाहिजे.

महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.

General Topics

पिंडावरचा कावळा…doctorforbeggars

ही मावशी काहीशी सडपातळ, रंग गोरेपणाकडे झुकणारा… डोक्यावर पदर आणि वागण्यात कमालीची शालिनता !

म्हातारपणाकडं झुकत चाललेल्या चेह-यावर एक गोड स्मित हास्य !

ही बसलेली असते एका ठिकाणी भिक मागत…! वय अंदाजे 55-60 वर्षे….

हिच्या डाव्या हाताला पाच वर्षाचा अतिशय चुणचुणीत मुलगा, उजव्या हाताला सहा वर्षाचा गोरा गोमटा तरतरीत मुलगा !

दोन्ही मुलांच्या अंगावर शाळेचा युनिफाॕर्म !!! आजीच्या मांडीला दोघेही बिलगुन बसलेली असतात.

हो…ही, यांची आज्जी… सख्खी !

मी या ठिकाणी 15 दिवसातुन एका शनिवारी जातो. हिची माझी ओळख दिड वर्षांपुर्वी झाली…

पहिल्यांदा भेटली तेव्हा अशीच दोन मुलांना आजुबाजुला घेवुन बसली होती….

म्हटलं… मावशी पोरं कुणाची ?

माजीच आहेत !

माजी म्हणजे ?

माजी म्हणजे, माज्या लेकाची… माजी नातवंडं हायत ही… !

ती त्यांच्या गालावरनं प्रेमानं हात फिरवत सांगते.

म्हटलं, पोरांची आई कुठाय ?

आसंल कुठंतरी… ती मोठ्या आवाजात बेफिकिरीनं बोलली….

आणि तुमचा पोरगा ?

त्योबी आसंल कुठंतरी… तोंडातल्या तोंडात पुटपुटलेल्या या वाक्यात मात्र व्याकुळता होती…

आजीला म्हटलं… आजी चांगल्या घरच्या दिसताय, एव्हढ्या गोड पोरांना बरोबर घेवुन भिक मागताय…

स्वतः पण मागताय, पोरांना पण भिक मागायला शिकवताय… शोभतं का हे तुम्हाला ?

शाळेचा युनिफाॕर्म आहे अंगावर, मग शाळेत का नाही गेली पोरं ?

पोरांना बघुन लोकं भिक जास्त देतात, म्हणुन शाळेतनं काढुन पोरांना रस्त्यावर बसवलंय का ? मी जरा रागानं बोललो…

पोरगा, सुन कुठाय ? भेटु का मी त्यांना ? कुठं राहतो पोरगा सांगा… मी भेटतो त्याला… ! अजुन आवाज चढवत मी म्हणालो.

आजीचे डोळे पाणावले…

पाणेजल्या डोळ्यांनी तीने आभाळाकडं बोट दावलं…!

ती म्हणाली, त्याला भेटायला वर जावं लागंल तुमाला… तुमी गेला तर सांगा त्याला…तुजी पोरं नीट सांभाळत्येय म्हणावं आई तुजी !

मी तिच्याकडं पाहिलं… डोळे पाण्यानं भरलेले… आणि स्मित हास्य जावुन चेह-यावर कारुण्य पसरलं होतं… धुकं पसरावं तसं…

धुक्यातनं वाट काढत चालावं, तशी अडखळत बोलली…
मलाबी माज्या पोराला भेटायचं हाय वो डाक्टर वर जावुन, पण या माज्या दोन लेकरांना खाली सोडुन वर जाता येत नाही… !

मी थोडा वरमलो.

आजीजवळ बसुन तीच्या भुतकाळात शिरलो…. तीच्याही नकळत…..

….. हि तरुण होती, तेव्हाची गोष्ट…!

नवरा सधन शेतकरी ! गावाकडं पाच एकर शेती. दोघं कष्ट करुन खायचे. संसार सुखाचा चालला होता. नवरा साधा भोळसट, चुलत मावस भावांनी गोड बोलुन सर्व शेती हडप केली, खुप भांडुनही न्याय मिळालाच नाही. उलट यांनाच गाव सोडायला भाग पाडलं. होत्याचं नव्हतं झालं …!

मग, पुण्यात एका चाळीत आले, हा हमाली काम करायचा आणि ती धुणीभांडी…!

पदरात, एक मुलगा, एक मुलगी… कष्ट करुन मुलांना शिकवलं.

मुलगी गोरीपान, अत्यंत देखणी, तितकीच सोज्वळ, त्यात ग्रॕज्युएट… बघता बघता एका श्रीमंत घरातली सुन म्हणुन गेली. हिचं लग्न थाटामाटात झालं.

आईबाप दोघंही हरखले.

राहता राहिला तो मुलगा, तोही कंपनीत कामाला लागला, त्याचंही लग्न करुन दिलं… यथावकाश त्याला दोन मुलं झाली.

पुन्हा एकदा गाडी रुळावर आली. एकुण मस्त चाललं होतं…

पण… नियतीला हे मान्य नव्हतं.

एके दिवशी मुलगा कसल्याशा आजारानं अचानक देवाघरी गेला. मागं तान्ही दोन पोरं टाकुन….

या तान्ह्या पोरांनी आपला बाप कधीच पाहिला नाही, आणि भविष्यातही पाहु शकणार नव्हती.

मागं उरलेल्या तरुण सुनेला आता या तुटलेल्या संसारात रस नव्हता, तीची कुणाबरोबर तरी मैत्री झाली, आणि एके रात्री ती त्याच्याबरोबर निघुन गेली, तीने दुसरा घरोबा मांडला, दुस-या शहरात !

दोन्ही तान्ह्या पोरांचा विचार न करता, पोरांना सासुच्या हवाली करुन, ही निघुन गेली.

जाताना हा सुद्धा विचार तीला शिवला नसेल ? की माझ्यावाचुन ही पोरं राहतील कशी ? आईच्या दुधावाचुन ही तान्ही बाळं जगतील कशी ?

खरंच ही आई होती…? की लादलेलं मातृत्व होतं ते ?

केवळ जन्म दिला म्हणुन ती आई होत नसते…

मातृत्वाचं लेणं आयुष्यभर जपण्याची *आं* तरीक *ई* च्छा असणं म्हणजे आई !

स्वतः जमिन होवुन पोरांनी *आ* भाळ व्हावं, ही *ई* च्छा धरते ती आई !

*आ* समंतात *ई* श्वराचं रुप म्हणुन जी भरुन राहते ती आई !

*मा* तीत स्वतःला गाडुन घेते, आणि *य* शाची ओंजळ लेकरावर धरते ती माय !

स्वतःचं मन *मा* रुन, लेकरांना आयुष्यभर *ता* रुन नेते ती माता !

लेकरांना सोडुन गेलेली ही बाई, यातल्या कुठल्या व्याख्येत बसते ….?

नव-याच्या अंतिम संस्कारावेळीही उपस्थित नसणाऱ्या हिला नेमकं काय म्हणावं…?

बराच वेळ म्हणे, पिंडाला कावळा शिवत नव्हता…

तेव्हा ही आज्जी आभाळाकडं बघुन म्हणाली होती, मी जिवंत हाय तवर तुज्या ल्येकरांचा सांभाळ करीन, त्यांची *आई* होवुन -हाईन…! तु काळजी करु नगो… तु काळजी करु नगो…. !!!

आज्जीनं फोडलेल्या या हंबरड्यानं कावळ्यांनाही पाझर फुटला असावा… !

ज्या हातांनी लहानग्या पोराला उचलुन कडेवर घेतलं… त्याच हातांनी पोराला उचलुन तिरडीवर ठेवायचं… त्या म्हाता-या हातांना कसं वाटलं असेल…?

ज्या पोराला डोक्यावर घिवुन नाचायचं, त्याच पोराला खांदा द्यायचा ? त्या म्हाता-या खांद्याला कसं वाटलं असेल ?

ज्या पोराला लहानपणी “चिवु काऊ” दाखवत जेवु घातलं… त्याच कावळ्यांना माझ्या पोरासाठी ठेवलेला हा शेवटचा घास आता तु खा म्हणायचं…? त्या शब्दांना कसं वाटलं असेल ?

कसं…कसं…कस्सं… वाटलं असेल ?

एव्हढं कमी म्हणुन की काय… काही दिवसातच आज्जीचा नवरा, हाय खावुन, परिस्थितीला हरुन बोलता बोलता, लेकाच्या आठवणीत, लेकाला भेटायला गेला आभाळात…!

तेव्हापास्नं, भरलेल्या या झोपडीत उरलेत आता फक्त तीन जीव… दोन लहान… भविष्याकडं नजर लावुन बसलेले आणि एक जीव थकलेला… भुतकाळाच्या मारानं पिचुन गेलेला…!

गेलेला भुतकाळ “भुत” म्हणुन मानगुटीवर बसलाय… भविष्यकाळ कुठंतरी दडुन बसलाय आणि दोघांच्या मधला जो “वर्तमान काळ”… या वर्तमान काळानं आजीच्या हातात भिकेची झोळी दिलेय…

भुतकाळाला विसरण्याचा प्रयत्न करत…वर्तमानकाळात हे पाय लटपटत लटपटत चालताहेत…. पोरांचा भविष्यकाळ शोधत….!

तेव्हापासुन हि आज्जी या लहानग्यांचा सांभाळ करते.

सख्खी आई सोडुन गेली… पण आईच होवुन *आज जी* या पोरांना मायेचा आधार देत्येत तीच ही *आज्जी….!!!*

ही आज्जी एव्हढी धिराची की तीनं एका संस्थेला मुलांच्या शिक्षणासाठी विनंती केली, आणि या संस्थेनं दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलीय.

आज्जी दोन्ही मुलांना बोटाला धरुन शाळेत नेते, शाळेतुन परत आणते.

एका हाताच्या बोटाला एक मुलगा आणि दुस-या हाताला दुसरा मुलगा…असं चालत जातांना तिघांनाही मी खुप वेळा पाहिलंय…

यांना असं रस्त्यात चालतांना पाहुन नेहमी वाटतं…
*वर्तमानकाळाचं बोट धरुन रस्त्यावरुन भविष्यकाळ चाललाय दिमाखात … भुतकाळाला पायाखाली तुडवत तुडवत…!*

भानावर येत, पाणावलेल्या डोळ्यांनी मी तीचे हात हाती घेवुन म्हटलं होतं… तुच यांची खरी आई ! खुप सोसलंस तु, तरी उठुन उभी राहिलीस…

ती यावर फक्त हसली होती.

आज्जी, या पोरांना तु इथं का बरं बसवतेस ? मी जरा चाचरत बोललो.

ती म्हणाली, नाय वो, आज शनवार ना ? आर्ध्या दिसाची शाळा… शाळेतनं पोरं मला भेटायला आली… आता आमी तिगंबी घरीच जाणार… आभ्यास कराया लावणार… मी न्हाय बा माज्या लेकरान्ला रस्त्यात घिवुन बसत…. ह्ये बगा निगाले मी… चला रं… म्हणत ती दोघांना घेवुन निघुन जाते…

आज्जीला बिलगुन तुरुतुरु चालणाऱ्या त्या आईबापाविना जगणाऱ्या पोरांवर आणि आईबाप होवुन पोरांना जगवणा-या त्या आज्जीच्या पाठमो-या मुर्तीवर नजर खिळुन राहते.

यानंतरही आज्जी मला नेहमीच भेटते. मध्ये हिचे डोळे पुर्ण जायची वेळ आली होती. डोळे गेल्यावर माज्या लेकरांचं कसं हुयील या विचारानं ती धास्तावली होती.

यानंतर आज्जीच्या दोन्ही डोळ्यांचे आॕपरेशन करुन घेतले, पुन्हा जेव्हा तीला नीट दिसायला लागलं, तेव्हा गळ्यात पडुन रस्त्यातच हमसुन हमसुन रडली होती…. !

रडतच म्हणाली होती, मला नाय, माज्या लेकरांनाच डोळे दिले तुमी जणु …तुमी जर माजं आपरेशन केलं नसतं तर आंधळी झाले आसते मी, मग माज्या लेकरांचं कुणी केलं असतं…? पोरं शिकुन मोठी होवुस्तवर देवाला म्हणावं… मला काय बी होवु देवु नगंस…. डाक्टर सांगाल का वो देवाला ?

हातांचं चुंबन घेत कळवळुन बोलणारी तीची ही वाक्यं ऐकुन डोळे कधी दगा देतात हेच कळत नाही !

ती सर्व श्रेय मला देते, पण मी एकटाच या श्रेयाचा धनी नाही !

भिक्षेक-यांचे डोळ्याचे आॕपरेशन करण्याची सुबुद्धी आम्हाला ज्या अज्ञात शक्तीने दिली त्या शक्तीचे आभार !

लोकसहभागातुन मिळणाऱ्या देणग्यांवरच हे सर्व काम सुरु आहे.

कौतुकाचे खरे धनी म्हणजे ज्यांनी आम्हाला हरत-हेनं मदत केली ते ज्ञात आणि अज्ञात देणगीदार…!

अर्थात तुम्हीच… !

जाणते आजाणतेपणी आपल्याकडुन कुणाचं तरी आयुष्यं सावरलं जातंय याचा आनंद शब्दात नाहीच सांगता येत.

अशा लोकांच्या अंधाऱ्या आयुष्यात तुमच्याचमुळे पुन्हा उजेड पडतोय… मी ऋणी आहे सर्वांचा…!

आजीनं मला दिलेले आशिर्वाद मी तुमच्यापर्यंत पोचवतोय, कृपया स्विकार करावा !!!

तर…. एकदा आज्जीला म्हटलं, तुजी पोरगी तर चांगली श्रीमंत आहे… तीला सांग की जरा मदत करायला…!

आज्जीनं हसत सांगितलं, तीच्या लग्नात जावयाचा मानपान आमच्याकडनं नीट झाला नाय म्हणुन तो आमच्यावर चिडुन हाय. शिवाय ती बंगल्यातली मान्सं, आमी झोपडपट्टीतले… त्याला आमची लाज वाटते. माज्या पोरीला सुद्धा मला भेटायची त्यानं बंदी घातलीय. तरी पोरगी तोंडाला रुमाल बांधुन येते, काहीबाही मदत करुन जाते, कधी कुणाच्या हाती काहीतरी गुपचुप पाठवुन देते.

पण ज्या दिवशी हि गोष्ट तीच्या नव-याला कळते त्यादिशी तीला तो मरुस्तवर मारतो… एकदा तर अॕडमिट करायला लागलं होतं… मग मी त्याच्याविरुद्ध पोलिस कम्प्लेंट केली….

तेव्हापसनं तर पोरीचं तोंड पण दिसु दिलं नाय त्यानं…

असुदे, आमाला नको मदत… मला न भेटता जर तीला तो सुखानं नांदवत आसंल, तरी मला चालंल… आमी जगु कसंबी….!

आज्जी नजर फिरवते… तीचे डोळे दिसत नाहीत, पण एका आईचे वाहणारे अश्रु लपतही नाहीत…!

मी तीला विचारलं, तुझी आणि मुलांची सोय कुठं होते का ? यासाठी प्रयत्न करु का ?

ती यावर नाही म्हणते… !

ज्या झोपडीत नवरा गेला, मुलगा गेला… त्या झोपडीत त्यांच्या आठवणी आहेत, वस्तुंना त्यांचा झालेला स्पर्श आहे… या त्यांच्या आठवणी आणि स्पर्शावरच शेवटपर्यंत जगायचं… आणि इथुनच निघुन जायचं असं तीनं ठरवलंय…. !

मी तीला दिलासा देण्यासाठी म्हटलं… मावशी, बघु नविन वर्ष सुरु झालंय… या नवीन वर्षात हुयील काहीतरी चांगलं…

ती शुन्यात पहात म्हणाली, डाक्टर, वर्ष फक्त वर्षातनं एकदाच बदलतं… माणसं दिवसातुन चारदा बदलतात, माणसं जोपर्यंत बदलायचं सोडणार नाहीत, तोपर्यंत कितीही वर्षे बदलली तरी उपयोगाची नाहीत…!

किती गहन गोष्ट सोप्या भाषेत या मावशीनं सांगितली…!

माणुस वाचतो खुप… पण त्यातुन कळलं किती हे महत्वाचं…!

ऐकतो खुप… पण समजलं किती हे महत्वाचं…!

जीवंत राहुनही… जगला कसं हे महत्वाचं…!

ही मावशी आज या मुलांची आई झालीय, बाप झालीय…. न वाचताही हिला बरंच काही कळलंय… आपलं आख्खं आयुष्य या पोरांच्या भविष्यासाठी तीनं रस्त्यावर मांडलंय… हिला जगणं कळलंय…!

आपण स्वतःचा विचार करत रात्र जागवतो त्याला “जागरण” म्हणतात…. दुस-यांचा विचार करत रात्र जागवणे याला “जागृती” म्हणतात…!

नुसतीच जागरणं करायची का जागृत व्हायचं, ज्याचं त्यानं ठरवायचं…!!!

मावशी म्हणते, पौर्णिमेचा चंद्र पहायचा असेल तर त्यो रात्रिलाच दिसणार… मग रात्र झाली अंधार पडला म्हणुन आपन का खंत धरायची ? ज्याला चंद्र बघायचाय त्यानं काळोख पचवायला बी शिकलं पायजे…

आयुष्याच्या युनिव्हर्सिटीनं मावशीला डबल ग्रॕज्युएट केलं होतं…!

औषध देतांना ही मला नेहमी म्हणते, डाक्टर मी जर गेल्याचं तुमाला कधी कळलं तर पोरांची काळजी घ्या, त्यांना संस्थेत टाका… पोरांना मी गेले असं सांगु नका, त्यांना सहन नाय होणार…..

आज्जी परत येणार आहे असंच सांगा… !

या वाक्यांनी मी गहिवरतो….!

ती पदर पसरते, कराल ना माझ्या माघारी डाक्टर ? कळवळुन पसरलेल्या तीच्या पदरात माझे अश्रु नकळत सांडतात… ती भाबडी या अश्रुंनाच माझा होकार समजत पदर सावरते…. !

तिकडुन मुलं येतात, आज्जीच्या पदराशी झोंबत तीला म्हणतात, चल ना घरी आज्जी ….

ही मावशीही उठते, पोरांना हाताला धरत निघते… भुवया उंचावत माझा निरोप घेते…

मी या तिघांच्या पाठमो-या आकृतीकडे पहात राहतो…निःशब्द !

देवा असशीलच कुठे तर पोरांच्या या आज्जीला जास्तीत जास्त जगव…

नाहीच जमलं तर या पोरांसाठी काही करायचं बळ मला दे…!

दोन्हीतलं एक काहीतरी कर…

करशील ना ? करच….!

नाहीतर हिच्याही पिंडाला कावळा शिवणार नाही बघ….!!!

*डाॕ. अभिजीत सोनवणे*
*डाॕक्टर फाॕर बेगर्स*
*सोहम ट्रस्ट, पुणे*
*9822267357*
*abhisoham17@gmail.com*
*www.sohamtrust.com*
*Facebook : SOHAM TRUST*

*दि. 15 जानेवारी 2019, वेळ पहाटे 5.15 मि*

General Topics

स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या सर्वासाठी खालील ग्रुप तयार करण्यात आलेत. तयारी करणाऱ्या सर्वाचे स्वागत.

1. स्पर्धा परीक्षा तयारी
https://chat.whatsapp.com/C9g8mraVOq70miNRcPvjdA

2. स्पर्धा परीक्षा तयारी
https://chat.whatsapp.com/Ex2bmCWDsitAkiu6TYAmQt

3. स्पर्धा परीक्षा तयारी
https://chat.whatsapp.com/G5T6Cx5clX90pT6127KjJW

4. स्पर्धा परीक्षा तयारी

https://chat.whatsapp.com/KKQR12UNMbtJKWr960WDL6

5. स्पर्धा परीक्षा तयारी
https://chat.whatsapp.com/FpngrYCb84FA6nwqUeyhpS

6. स्पर्धा परीक्षा तयारी
https://chat.whatsapp.com/En71NgU5fdLEi6h6liZHAJ

7. स्पर्धा परीक्षा तयारी
https://chat.whatsapp.com/BPT2vSYS2HB1QWm317wcQX

8. स्पर्धा परीक्षा तयारी

https://chat.whatsapp.com/LQz78b9tmtB9c4D223wQ7P

9. स्पर्धा परीक्षा तयारी

https://chat.whatsapp.com/KbUQHsCOQ9BIyXDnUQJk7A

10. स्पर्धा परीक्षा तयारी
https://chat.whatsapp.com/L51OJANu3inGCQEvXMTTcE

_*share & visit*_

_*www.diyd2016.wordpress.com*_

General Topics

राजकारण करायचे असल्यास युवा नेते बनण्यापूर्वी निदान स्वतःच्या दोन वेळच्या भाकरीची तजवीज करून ठेवा…

राजकारण* करायचे असल्यास *युवा नेते* बनण्यापूर्वी निदान *स्वतःच्या दोन वेळच्या भाकरीची तजवीज करून ठेवा…*

*व्याजाने* पैसे आणून कितीही मोठ मोठाले *होर्डिंग्ज* लावले तरी *घरी कुणीही धान्य आणून देत नसतं…*

*तुमची उपयुक्तता संपली* की तुम्हाला तुमचे *आदर्श नेते खरूज लागलेल्या कुत्र्याप्रमाणे फाटकाबाहेर हाकलून देतील…*
तुम्ही *हातात* मोठ्या *अभिमानाने मिरविलेले पिवळे , भगवे , निळे आणि हिरवे झेंडे तुमच्या अवस्थेवर खो खो हसतील…*

*नोकरी किंवा व्यवसाय* नसलेल्या *तरुणांचा भविष्यकाळ अत्यंत बिकट असणार आहे…*
जे लोक तुम्हाला *करियर डेव्हलपमेंटच्या* गोष्टी सांगतात , ते स्वतःच कुणाची तरी *भाड खाऊन कुटुंबनिर्वाह करतात…*

कुणी आपला *स्वाभिमान* विकलेला आहे, कुणी *कळलाव्या* नारदाची भूमिका बजावत आहे,
अशा *वाममार्गानेच* तुमचे *आवडते नेते* पैशांनी *गब्बर* झालेले आहेत व येथून पुढे *राजकारण हे त्यांच्याच अवती भवतीच फिरणार आहे…*

*पक्ष, पक्ष- संस्कार, पक्षाची विचारधारा* या निव्वळ पोकळ गप्पा असून *या भाकडकथा तुमच्या माझ्यासारख्या तरुणांना फुकटात राबवून घेण्यासाठीच रचलेल्या आहेत…*

जेवढा *वेळ* आपण *नेत्यांच्या मागे धावण्यात वाया घालवितो,* तेवढ्या वेळात एखाद्या *कपड्याच्या* दुकानात काम करून महिन्याकाठी ५ ते १० हजार रुपये कमवून आपण आपल्या *आई वडिलांच्या हाती देऊ शकत असू,* तर या जगात *आपल्यापेक्षा मोठा विकासपुरुष अन्य कुणीही असू शकत नाही…*

आपल्या *एकामुळे* जगाचे काहीही *बरे-वाईट* होत नाही. आपण *स्वतःचा विकास* केल्यास *राष्ट्राचा विकास* आपोआप होतो. *५० लाखांच्या* गाडीत हिंडणाऱ्या व्यक्तीस *गरीबाशी, बेरोजगाराशी काहीही देण घेण नसतं,* तो फक्त आपला *स्वार्थ* जपत असतो. त्यामुळे आपली *घरची परिस्थिती* बेताची असल्यास *नेत्यांच्या अजिबात मागे लागू नका…*

आपल्याला पुढे *आर्थिक चणचण, शुगर, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, राजकारणाच्या नादी लागून फुकटचे विकत घेतलेले शत्रुत्व व बेरोजगारी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे,* जेव्हा *तुमचे* आवडते *नेते तुम्हाला १ रुपयाची सुद्धा मदत करणार नाही…*

तुमचं *तारुण्य* निघून गेल्यावर कुणीही तुम्हाला *दारू पाजणार नाही* किंवा *मटन खाऊ घालणार नाही,* कारण तुमचा *उपयोग संपल्यावर* अन्य कुणी तरी दुसरा *मूर्ख तरुण* रिक्रुटमेंटसाठी कायम *नेत्यांपुढे* तयार असेलच . मग *चोरी, गुन्हेगारी किंवा आत्महत्या* या तीन *पर्यायांखेरीज अन्य कुठचाही पर्याय तुमच्याजवळ शिल्लक नसेल…*

*स्वतःला सावरून आयुष्य संपन्न बनविण्याचे हेच वय असते.* हे वय *नेत्यांच्या मागे धावण्यात वाया घालवू नका…!*

*दिल पे लगेगी तभी तो बात बनेगी।*

*( टीप :- 2019 जवळ येतोय म्हणून हि माहिती युवक मित्रांनी लक्षात घायची आहे )*

*आईबापाला घोटभर पाणी न देणारं पोरगं* !!
*नेत्याच्या वाढदिवसाला बाटलीभर रक्त देवून येतं* !

General Topics

सिकंदर आणि डायोझेनस एकाच देशाचे. सिकंदरला बेफाट सत्ता हवी होती, जग काबीज करायचे होते. त्यासाठी तो कष्ट घेत होता, लढत होता, जगभरावर स्वारी करत होता.

सिकंदर आणि डायोझेनस एकाच देशाचे.

*सिकंदरला बेफाट सत्ता हवी होती, जग काबीज करायचे होते. त्यासाठी तो कष्ट घेत होता, लढत होता, जगभरावर स्वारी करत होता.*

*_डायोझेनस हा फकीर होता. आपल्या गरजा कमी करत करत जगत होता. एक दिवस जनावरे जगातात तर आपण का नाही याचा विचार करून त्याने आपली वस्त्रे देखील त्यागून टाकली. पाणी प्यायला एक भांड यापलीकडे त्याची संपत्ती नव्हती. एका कुत्राला वाहत्या पाण्यात तोंडाने पाणी पितांना बघून त्याने ते भांडे देखील फेकून दिले._*

एका रम्य सकाळी समुद्र किनारी डायोझेनस सकाळचे कोवळे ऊन खात बसला होता. सिकंदर तिथे आला, त्याची सावली डायोझेनसवर पडली. त्याला असे विवस्त्र बघून सिकंदर म्हणाला,

-मी सम्राट आहे इथला, माग काय मागायचे ते.
-मला काहीही नको आहे.
-अरे माग, असे काहीही नाही जे मी तुला देऊ शकणार नाही.
-नकोय मला काहीही.
-अरे पण का?
-कारण तू मला जे हवे ते देऊ शकणार नाहीस.
-असे काय आहे जगात.
-मित्रा बाजूला हो, तुझ्यामुळे माझ्या अंगावर येणारे हे कोवळे ऊन अडले आहे. हे कोवळे ऊन मला फक्त सूर्य देऊ शकतो, कितीही अब्जाधीश तू असलास तरी नाही. आयुष्यात काहीही करता आले नाही तरी चालेल पण काळजी घे.
-कसली?
*-कोणाच्याही आयुष्यात येणारा प्रकाश तू अडवू नकोस कारण प्रकाश देण्याची क्षमता तुझ्यात नाही !!!!*

****

*मार्क ट्वेन एकदा आपल्या कार मधून घरी निघाले होते. रस्त्यात गटारीत एक कुत्र्याचे छोटू पिल्लू पडले होते. ते पिल्लू वर येण्याची धडपड करत होते, पण त्याला जमत नव्हते.* कार पुढे गेली, मार्कने ड्राइव्हरला गाडी फिरवायला सांगितली. त्या गटारात हात घालून त्यांनी पिल्लाला बाहेर काढले, पिल्लू आनंदाने शेपटी हलवत निघून गेले.

हात रुमालाला पुसून मार्क गाडीत येऊन बसला. गाडी निघाली, ड्राइव्हरला चैन पडेना, त्याने विचारले.

-असे का केले तुम्ही, आय मीन अशी काय गरज होती.
*-हे बघ, मी त्याला काढले नसते तर ते पिल्लू नक्की मरणार होते. आणि मुख्य म्हणजे मला रात्रभर झोप आली नसती.*
-का झोप आली नसती?
*_-माझ्या आयुष्याचे काही सेकंद खर्च केल्याने एकाचा जीव वाचू शकला असता आणि मी स्वार्थी माणसासारखी ती काही सेकंद खर्च केली नाही ह्या विचाराने मला आयुष्यभर झोप आली नसती. जे आयुष्य मी देऊ शकत नाही, ते मी वाचवू नक्की शकतो…_*

*****

*दोन्ही कथा माझ्या नाहीत, कुठेतरी वाचल्यात. जो प्रकाश आपण देऊ शकत नाही तो हिरावून घेऊ नये आणि माणूस म्हणून मिळालेल्या या जीवनाचे शक्य तितकी मदत करून सार्थकी लावावे…💎*

General Topics

१२ जानेवारी – माँ साहेब जिजाऊ जन्मदिवस…दोन छत्रपतींना घडवणाऱ्या .. राजमाता ,राष्ट्रमाता ,जिजाऊ माँ साहेबांना जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन !

आपल्या मनात तयार असलेली स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता!
कर्तृत्व मनगटात उतरण्यापूर्वी त्याला मनात रुजवावं लागतं. मडक्याचा आकार कुंभाराच्या हातांवर आणि त्याहीपेक्षा त्याच्या प्रतिभेवर, कल्पना क्षमतेवर अवलंबून असतो. कर्तृत्ववान पुरुषांचंही हेच सूत्र आहे. बालपणापासून ज्याला वाघ दिसला की झेप घेऊन त्याच्याशी त्याच्याच त्वेषानं लढावं ही शिकवण दिली जाते, तो आयुष्यात कशाचीही तमा करत नाही
स्वराज्याच्या आड येणाऱ्या भेकडांशी लढण्याचं धैर्य शहाजीपुत्र शिवरायांना मिळालं ते जिजाऊंच्या निडरपणे जगण्याच्या संस्कारांतून. राजे सिंदखेड वतनाचे (सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील) पाच हजारी मनसबदार लखोजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. कर्तृत्ववान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे पाळण्यात असल्यापासून जिजाऊंच्या कानावर होते, पण वयासोबत पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली आणि लाचारीच्या व फितुरीच्या रोगाचा त्या मनापासून तिरस्कार करू लागल्या.
ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात, त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. लष्करी प्रशिक्षणासाठी लखोजींकडे हट्ट करणाऱ्या जिजाऊंना शूरवीरांच्या कथा ऐकून स्फुरण चढे. म्हाळसाईंनी आपल्या लेकीला अशा कथा सांगून तिच्या शूरपणाला प्रोत्साहन दिले.
लोकांनी गुलाम व्हावे, मुसलमानी साम्राज्याची इमाने इतबारे चाकरी करावी आणि मनसबदार, वतनदार व्हावे. ज्ञानी माणसांनी आपल्याच माणसांची घरे लुटून शत्रूने किती कमाई केली याचा हिशेब शत्रूलाच सांगावा. कलाकारांनी आपल्याच माणसांची फजिती रंगवून-रंगवून शत्रूला ऐकवावी. सगळंच विपरीत घडत होतं. शत्रूचे सरदार आया-बायांची अब्रु वेशीवर टांगत होते. मुलींचा लिलाव होत होता. स्वातंत्र्य कशाला म्हणतात हे विसरून गेलेला समाज निमूटपणे सगळे अत्याचार सहन करत होता. शेतकऱ्यांची तर याहून वाईट अवस्था होती. पिकवावं आपण आणि कणगी मात्र बादशहाची भरावी. घाम गाळावा पण पोट भरू नये. समाजाची ही दयनीय अवस्था जिजाऊंना बघवत नव्हती. त्यांना या अन्याय-अत्याचाराविरुद्ध लढणारा वीर पाहायचा होता.
जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसलेंशी झाला . दोन तेजस्वी जीव एकत्र आले, पण तरीही जिजाऊंच्या स्वप्नातल्या साम्राज्याची पहाट दिसत नव्हती. पराक्रमी शहाजीराजांची ओढाताण जिजाऊ जवळून अनुभवत होत्या. त्यांचे आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही इत्यादी शाहींमध्ये पराक्रम गाजवूनही असलेले दुय्यम स्थान जिजाऊंना जाणवत होते. ती सत्ता असली, तरी ‘तेथे’ मानसन्मान नाही, स्थिरता नाही, रयतेचं कल्याण नाही, याचे जिजाऊंना भान येत होते. मुलाच्या जन्माआधी त्याच्या जीवनाचं ध्येय ठरवणाऱ्या किती माता या समाजात असतील, पण एका मातेने ती किमया केली आणि शतकानुशतके स्वराज्यावर अन्याय करणाऱ्या शत्रूंचा नि:पात झाला.
जिजाऊंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला आणि शिवजन्मासोबत स्वराज्याच्या पायाभरणीला सुरुवात झाली. जिजाऊंनी शिवरायांना गोष्टी सांगीतल्या त्या पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या. प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते, जे पारतंत्र्यात असतात, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे’, ही त्यांनी शिवरायांना दिलेली शिकवण होती. आणि त्यासोबत ‘आपण- समाज, तू आणि मीही – पारतंत्र्यात आहोत’, ही प्रत्येक कथेनंतर दिलेली जाणीव होती. कर्तृत्व गाजविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे ही शिवरायांची धारणा झाली, ती जिजाऊंच्या या संस्कारांमुळेच.
शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतांनाच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचं धाडस दिलं. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईनं लक्ष ठेवलं. शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असतांना, खुद्द जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत.
मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा, तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण माँ जिजाऊ त्याला अपवाद आहेत. शहाजीराजेंच्या गैरहजेरीत त्यांनी दोन्ही भूमिका पार पाडल्या. या संस्कारांच्या जोरावरती छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली, स्वराज्याची स्थापना केली. पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची, प्रोत्साहनाची, मार्गदर्शनाची फुंकर घालत त्याला राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ माँ लढत राहिल्या .
जिजाऊमाता यांनी संभाजीराजेंना राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. पुत्राप्रमाणे नातवावर उत्तम संस्कार करणाऱ्या जिजाऊ माता म्हणजे स्वराज्याच्या खऱ्या अर्थाने विद्यापीठ आहेत.
*राजमाता ,राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना जन्मदिना निमित्त कोटी कोटी प्रणाम….*👏👏👏