अभ्यास करी विद्येचा
विद्येस देव मानून

घे नेटाने तिचा लाभ
मनी एकाग्र होऊन

विद्या हें धन आहे रे
श्रेष्ठ साऱ्या धनाहून

तिचा साठा जयापाशी
ज्ञानी तो मानती जन

*कवयीत्री*
सावित्रीमाईं फुले

Advertisements