देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामधे उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थयाना छत्रपतीं शाहू महाराज शिष्यवृत्ती

संदर्भ: दैनिक सकाळ 31 ऑगस्ट 2018

कोणताही माणूस जर स्वतःला लीडर /नेता / प्रमुख समजत असेल तर त्यांच्या मध्ये हे खालील गुण असने आवश्यक आहेत.

1) दूरदृष्टी (vision) :

लीडरने निर्माण केलेल्या खेळीमेळीच्या वातावरणातही एक प्रकारची दूरदृष्टी दडलेली असते.

2) ध्येयनिश्चिती (Goal):

लीडरने आपल्या पुढे काही ध्येय निश्चित केली पाहिजेत.

3) आत्मविश्वास (self confidence) :

ध्येयावर असलेला जबरदस्त विश्वास आणि निष्ठा ही नेतृत्वाची खरी शक्ती असते.

4) अनुशासन (Discipline):

एक चांगला लीडर एक चांगली अनुशासीत व्यक्ती असणे आवश्यक आहे.

5) चिकाटी (Persistance):

*कोणत्याही कामामध्ये विजय मिळविण्यासाठी लीडरच्या प्रयत्नांमध्ये सातत्य आणि चिकाटी असणे आवश्यक असते.*

*6) नियोजन (Planning):*

*नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीकडे ध्येय गाठण्यासाठी योजना तयार असाव्या लागतात. आणि त्या योजना पूर्ण करण्यासाठी नियोजन व पूर्व तयारी करण्याची जबाबदारी लीडरलाच पार पाडावी लागते.*

*7) योग्य निर्णय (Proper Judgement):*

*लीडरला सर्वांची बाजू ऐकून , सर्वांचे हित पाहून योग्य निर्णय घेतला पाहिजे.*

*8) धैर्य (Patience):*

*नेतृत्व करताना लीडरला चौकटी बाहेरच्या काही गोष्टी अमलात आणाव्या लागतात. त्यासाठी नेत्याकडे धैर्य असावे लागते.*

*9) जबाबदारी स्वीकारणे (Accept Responsibilities):*

*नेतृत्व हे जबाबदारी स्वीकारणारे असले की टीमची कार्यक्षमता वाढते व कामाचे समाधान मिळते.*

*10) बदलाचा स्वीकार (Accept changes):*

*बाहेरच्या जगात वेगाने बदल होत असतांना , आपल्या बदलाचा वेग मंदावला असेल तर… नेतृत्वाची दूरदृष्टी कुठे तरी हरवली आहे असे समजावे.*

*11) मार्गदर्शक व प्रशिक्षक व्हा*
*(Be A Coach & Guide):*

*प्रत्येकाला त्याच्या आवाक्यातलं आणि क्षमतेच काम वाटून दिल पाहिजे.प्रसंगी मार्गदर्शन आणि त्या त्या विषयाचे ज्ञान दिले पाहिजे.*

*12) आकर्षक व्यक्तिमत्व* *(Pleasing Personality):*

*एक लीडर म्हणून तुमच्यावर , तुमच्या शब्दांवर आणि अर्थातच तुमच्या ध्येय धोरणांवर लोकांनी विश्वास ठेवायला हवा. त्यासाठी सहकाऱ्यांशी सतत संवाद राखायला पाहिजे.*

*13) प्रशासनिक कौशल्य* *(administrative skills):*

*एक लीडर म्हणून त्याच्या जवळ प्रशासनिक कौशल्य असणे गरजेचे आहे.*

*14) संभाषण कौशल्य* *(Communication skills):*

*एक चांगला लीडर बनण्यासाठी सर्वात मोठी कला हवी असते ती म्हणजे संभाषण कौशल्याची क्षमता.*

*15) निर्णय घेण्याची कला*
*(Decision making ability):*

*एक लीडर म्हणून सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेता आला पाहिजे.*

*16) जोखीम घेण्याची क्षमता*
*(Risk Taking Ability):*

*नेतृत्व करताना धैर्याबरोबरच जोखीम घ्यायची तयारीसुद्धा लीडर मध्ये असली पाहिजे.*

*17) क्रिएटिव्हिटी, संशोधन आणि प्रेरक*
*(Creativity and Innovation):*

*हि कौशल्य लीडर मध्ये असली पाहिजेत.*

*18) समस्या सोडविण्याचे कौशल्य*
*(problem solving skills):*

*खऱ्या लीडरची ओळख तेव्हाच होते जेंव्हा तो आपल्या समस्यांचा सामना कसा करतो यावरूनच.*

*19) लवचिक आणि अनुकूल क्षमता (Flexibility And Adaptability):*

*लीडर म्हणून नेहमी लवचिक व अनुकूल राहता आले पाहिजे.*

20) वेळेच्या व्यवस्थापणाचे कौशल्य
(Time Management Skills):

लीडरला जर आपले ध्येय गाठायचे असेल तर त्यासाठी वेळेचे नियोजन केलेच पाहिजे.

21) लोकांना प्रोत्साहित करा ( Motivate People):

लीडर ने आपल्या लोकांना नेहमीच प्रोत्साहन दिले पाहिजे.

22) आपण स्वतः आधी कार्यप्रवण होणे.
(Lead By Example):

कोणत्याही लीडर ने फक्त सूचना न देता स्वतः पुढाकार घेऊन कामाची दिशा आणि आखणी करणारा पाहिजे.

23) टीम प्लेयर्स व्हा ( Be Team Players):

लीडर ची प्रमुख जबाबदारी आहे की एक चांगली टीम तयार करणं आणि त्या टीमचा एक भाग बनणे.

मनापासून शांतपणे वाचा….

★ जिथं आपली कदर नाही , तिथे कधीही जायचे नाही. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो,त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. जे नजरेतून उतरले,त्यांच्या त्रास करून घायचा नाही.
★आपले हातून एखादयाचे काम होत असेल तर ते निस्वार्थी व निसंकोच करा. नेहमी मदत करा दुसर्याला त्रास होईल असे कदापी वागू नका.
★नेहमी स्वतः सोबत पैज लावा, जिंकलात तर आत्मविश्वास’ जिंकेल, आणि हरलात तर ‘अहंकार’ हरेल.

★पाण्याने भरलेल्या तलावात.मासे किड्यांना खातात, तर तोच तलाव कोरडा झाल्यास. किडे मास्यांना खातात..संधी सगळ्यांना मिळते.फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा…!
★ एखाद्या जवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर.त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्कीच आलं पाहिजे…!
★ तुम्ही स्वत:च्या खांद्यावर डोके टेकुन रडू शकत नाही आणि स्वत:च स्वत:ला आनंदाने मिठीही मारू शकत नाही…! आयुष्य म्हणजे दुस-यांसाठी जगायची बाब आहे…!
★जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाहीं तर आपल्या मनात रुजवावे लागते..
★वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो कि आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.
★जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही.परमेश्वरानं सोनं निर्माण केलं. चाफ़्याची फ़ुलं सुद्धा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ़्याचा वास नसता का देता आला ? अपुर्णतेतही काही मजा आहेच की..
★दगडात मूर्ती असतेच. त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि मग ह्याच भावनेने माणसाकडे पहा. माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका.
★जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा. जेव्हा आर्थिक परिस्थती चांगली असेल तेव्हा साधे रहा. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत रहा.
★आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं , कारण अशा स्थळावरून परतताना माणूस ‘माणूस’ राहत नाही. परतून येतं ते चैतन्य!
★सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा.समुद्र हा सर्वांसाठीच सारखाच असतो . काहीजण त्यातून मोती काढतात तर काहीजण मासे काढतात तर काहीजण फक्त पाय ओले करतात.. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे महत्वाचे..
★तुम्ही कोणासाठी कितीही केले, तरी ते कोठेतरी कमीच पडते. कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत , खोटं गावभर हिंडून आलेलं असतं.

★प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही, पण त्यांचा उद्देश फक्त तुमची
काळजी घेणं हाच असतो.

★जगातलं कटु सत्य हे आहे
की “नाती” जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जातो.

★नेहमी लक्षात ठेवा की, ‘.आपल्या कडे असलेल्या संपत्तीचा बडेजाव करू नका. भरकटलेल्या जहाजात कितीही पैसा असला तरी पिण्याचे पाणी मिळत नाही. जमिनीशी जोडलेले राहा.
★ पदाचा, संपत्तीचा कधी गर्व करू नये.
संकलन: वॉटसअप

शाळेतील सरांनी बोर्ड वर लिहले….

शाळेतील सरांनी बोर्ड वर लिहले.
9×1 =9
9×2 =18
9×3 =27
9×4 =36
9×5 =45
9×6 =54
9×7 =63
9×8 =72
9×9 =81
9×10=89

लिहल्यानंतर सरांनी मुलांकड़े पाहिलं, तर मूलं त्यांच्यावर हसत होती कारण शेवटची एक लाइन चुकली होती.

स्मितहास्य करत सरांनी मुलांकडे पाहिले आणि म्हणाले की, मी शेवटची लाईन मुद्दाम चूकीची लिहली आहे कारण तुम्हा सर्वांना खुप महत्वपूर्ण अशी शिकवण देऊ शकेन.

समाज तुमच्याशी असाच व्यवहार करेल.

तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्ष्यात येईल कि, बोर्ड वर मी नऊ वेळा बरोबर लिहलं आहे तरीसुद्धा माझ कोणीच कौतुक केले नाही.

माझ्या फक्त एका चुकीवर आपण सर्वजन हसलात आणि मला समजून घेतले नाही.

तात्पर्य:
तुम्ही लाख चांगली कार्य केली तरी समाज कधी ही तुमच्या चांगल्या कार्याच कौतुक करणार नाही. पण तुमची एक जरी चुक झाली तर ते तुमच्यावर असच हसतील आणि ते तुम्हाला कधीच समजून घेणार नाही.