दिनांक 26/1/2018 रोजी RTE parents Association च्या वतीने चाकण येथील डेल्टा युवा विकास संस्था; मेदनकर वाडी चाकण ; येथे शिक्षण हक्क कायदा 2009 याबाबत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात RTE कार्यकर्ते संदीप वाघ सर आणि दीपरत्न गजभिये सर मार्गदर्शक होते. दीपरत्न सर यांनी यांनी प्रास्ताविक मांडले. त्यानंतर संदीप वाघ सर यांनी प्रथम RTE perents Association ची माहिती दिली.या संघटनेची कार्यपद्धती पालकांना सांगितली.त्यानंतर RTE कायद्याची पार्श्वभूमी, याअंतर्गत कोणकोणत्या शाळा येतात, कोणत्या घटकांना rte अंतर्गत ऍडमिशन मिळेल, rte कायद्यातील राखीव जागेसाठी काय तरतुदी आहेत, rte चे नियम कोणते आहेत,अर्ज सादर करताना कोणकोणती कागदपत्रे लागतील, प्रवेश अर्ज कसा भरायचा,सिलेकशन कशा पद्धतीने केले जाते आणि rte पालकांचे कोणते अधिकार आहेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
त्यानंतर दीपरत्न गजभिये सर यांनी सर्व पालकांच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. तसेच त्यांनी पालकांकडून आलेल्या शंकांचे अतिशय योग्य प्रकारे निरसन केले.

आजच्या पालकसभेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय चाकण मधील पालक उपस्थित होते, त्यातही सर्व पालक हे गरीब व गरजू होते हे आवर्जून सांगावे लागेल.दीपरत्न सर यांनी वस्ती वस्तीत जाऊन पालकांना बोलावून आणले. जे लोक हात मजुरी करतात अशा लोकांना मार्गदर्शन करून खूप चांगले वाटले.त्यातील बऱ्याच लोकांकडे साधा मोबाईल होता.

आनंद वाघमारे सर यांनी त्यांचा हॉल मीटिंग साठी उपलब्ध करून दिला, तसेच ऍडमिशन सेन्टर ची सोय करून आपले योगदान दिले,त्यांचेही खूप खूप आभार.
एकंदरीत आजची पालकसभा आम्हा कार्यकर्त्यांसाठी एक आगळा वेगळा अनुभव होता.हि सभा आयोजित करणाऱ्या दीपरत्न गजभिये सरांचे विशेष आभार.

Advertisements