DELTA INSTITUTE FOR YOUTH DEVELOPMENT

बऱ्याचदा पेपर मधे एखाद्या mlm कंपनी ने केलेली फसवणूक आणि त्यामुळे अक्षरश: टोका च्या चर्चा रंग्लेल्या पाहायला मिळतात.

MLM मल्टि लेवेल मार्केटिंग एक व्यवसाय मॉडेल आहे. यात विविध स्तरावर काम करणाऱ्या व्यक्ति त्यांच्या स्तर निकष ठरल्या प्रमाणे कमीशन मिळवतात.

एखादी वस्तु अथवा सेवा स्वतः विकत घेऊन ती दुसऱ्या व्यक्तीला आपण विक्ल्यास आपल्याला देखील कमीशन मिळणार.

इतक सोप्पं गणित आहे. या मॉडेल मधे काहीच वाईट नाही. पण केवळ काही कंपनी नी आपला कारभार व्यवस्थित केला नाही इतकंच.

मग प्रश्न उरतो mlm ला जॉइन व्हाव की नको. खर तर हा वैक्तीक प्रश्न आहे.
पण;
जॉइन होताना काही गोष्टींची काळजी जरूर घ्यावी.

1. कंपनी कोणती आहे;ऑफीस कुठे आहे;मालक कोण आहे

2. कंपनी लायसन्स ;pan कार्ड ;रजिस्ट्रेशन इतर कायदेशीर कागद पत्रे पूर्ण आहेत का

3. कंपनी नेमकं काय करते व कशा पद्धतीने पैसे देणार किंवा घेणार आहे

4. आपल्या कडे येणारा एजेंट हा खरंच त्या कंपनीचा प्रतिनिधि आहे का ?
इत्यादी

थोडासा अभ्यासपूर्वक विचार करून आपली संभाव्य फसवणूक टाळता येऊ शकते .

याविषयी अधिक सविस्तरपणे पुढील अंकात लिहिणारच आहे.

*आनंद वाघमारे*
संचालक;DIYD

क्रमशः

Advertisements