Educational Topics · Latest News · Uncategorized

चाकण येथील RTE मार्गदर्शन शिबिरात पालकांचा चांगला प्रतिसाद

दिनांक 26/1/2018 रोजी RTE parents Association च्या वतीने चाकण येथील डेल्टा युवा विकास संस्था; मेदनकर वाडी चाकण ; येथे शिक्षण हक्क कायदा 2009 याबाबत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात RTE कार्यकर्ते संदीप वाघ सर आणि दीपरत्न गजभिये सर मार्गदर्शक होते. दीपरत्न सर यांनी यांनी प्रास्ताविक मांडले. त्यानंतर संदीप वाघ सर यांनी प्रथम RTE perents Association ची माहिती दिली.या संघटनेची कार्यपद्धती पालकांना सांगितली.त्यानंतर RTE कायद्याची पार्श्वभूमी, याअंतर्गत कोणकोणत्या शाळा येतात, कोणत्या घटकांना rte अंतर्गत ऍडमिशन मिळेल, rte कायद्यातील राखीव जागेसाठी काय तरतुदी आहेत, rte चे नियम कोणते आहेत,अर्ज सादर करताना कोणकोणती कागदपत्रे लागतील, प्रवेश अर्ज कसा भरायचा,सिलेकशन कशा पद्धतीने केले जाते आणि rte पालकांचे कोणते अधिकार आहेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
त्यानंतर दीपरत्न गजभिये सर यांनी सर्व पालकांच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. तसेच त्यांनी पालकांकडून आलेल्या शंकांचे अतिशय योग्य प्रकारे निरसन केले.

आजच्या पालकसभेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय चाकण मधील पालक उपस्थित होते, त्यातही सर्व पालक हे गरीब व गरजू होते हे आवर्जून सांगावे लागेल.दीपरत्न सर यांनी वस्ती वस्तीत जाऊन पालकांना बोलावून आणले. जे लोक हात मजुरी करतात अशा लोकांना मार्गदर्शन करून खूप चांगले वाटले.त्यातील बऱ्याच लोकांकडे साधा मोबाईल होता.

आनंद वाघमारे सर यांनी त्यांचा हॉल मीटिंग साठी उपलब्ध करून दिला, तसेच ऍडमिशन सेन्टर ची सोय करून आपले योगदान दिले,त्यांचेही खूप खूप आभार.
एकंदरीत आजची पालकसभा आम्हा कार्यकर्त्यांसाठी एक आगळा वेगळा अनुभव होता.हि सभा आयोजित करणाऱ्या दीपरत्न गजभिये सरांचे विशेष आभार.

Business · Uncategorized

मी MLM बिजनेस करू का नको?

DELTA INSTITUTE FOR YOUTH DEVELOPMENT

बऱ्याचदा पेपर मधे एखाद्या mlm कंपनी ने केलेली फसवणूक आणि त्यामुळे अक्षरश: टोका च्या चर्चा रंग्लेल्या पाहायला मिळतात.

MLM मल्टि लेवेल मार्केटिंग एक व्यवसाय मॉडेल आहे. यात विविध स्तरावर काम करणाऱ्या व्यक्ति त्यांच्या स्तर निकष ठरल्या प्रमाणे कमीशन मिळवतात.

एखादी वस्तु अथवा सेवा स्वतः विकत घेऊन ती दुसऱ्या व्यक्तीला आपण विक्ल्यास आपल्याला देखील कमीशन मिळणार.

इतक सोप्पं गणित आहे. या मॉडेल मधे काहीच वाईट नाही. पण केवळ काही कंपनी नी आपला कारभार व्यवस्थित केला नाही इतकंच.

मग प्रश्न उरतो mlm ला जॉइन व्हाव की नको. खर तर हा वैक्तीक प्रश्न आहे.
पण;
जॉइन होताना काही गोष्टींची काळजी जरूर घ्यावी.

1. कंपनी कोणती आहे;ऑफीस कुठे आहे;मालक कोण आहे

2. कंपनी लायसन्स ;pan कार्ड ;रजिस्ट्रेशन इतर कायदेशीर कागद पत्रे पूर्ण आहेत का

3. कंपनी नेमकं काय करते व कशा पद्धतीने पैसे देणार किंवा घेणार आहे

4. आपल्या कडे येणारा एजेंट हा खरंच त्या कंपनीचा प्रतिनिधि आहे का ?
इत्यादी

थोडासा अभ्यासपूर्वक विचार करून आपली संभाव्य फसवणूक टाळता येऊ शकते .

याविषयी अधिक सविस्तरपणे पुढील अंकात लिहिणारच आहे.

*आनंद वाघमारे*
संचालक;DIYD

क्रमशः

Business · Uncategorized

व्यवसाय सुरू करताना

DELTA INSTITUTE FOR YOUTH DEVELOPMENT
नवीन उद्योग उभा करताना येणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरे शोधताय?

1. उद्योग कोणता करायचा ?
2. भांडवल उभारणी
3. रजिस्टर करने
4. लाय्सेँस मिळवणे
5. सरकारी कर्ज योजना
6. कर भरना gst
7. प्रोजेक्ट रिपोर्ट सशुल्क तयार करून मिळेल
8. व्यवसाय प्रशिक्षण
9. आवश्यक कागदपत्रे

कन्सल्टिंग चार्जेस:
1000 Rs.

वरील सर्व गोष्टींचे प्रशिक्षण मार्गदर्शनसुद्धा मिळेल एकाच छताखाली.

संपर्क:
संपूर्ण पत्ता:
डेल्टा यूवा विकास संस्था;
ग्राम पंचायत जवळ; मेदनकरवाडी- चाकण 410501

वेळ : सकाळी 9 ते संध्या. 5

मो.क्र. 9028253251

*प्रत्यक्ष भेटिकरीता appointment घेणे आवश्यक आहे.*

आनंद वाघमारे
संचालक;DIYD

To Join DIYD click below link:
https://chat.whatsapp.com/KHRq5TzW06g65H8QM8r3qm

Share with friends.

Anand Waghmare · DIYD NewsLetter · Latest News · Uncategorized

जे ठरवू ते मिळवायची जिद्दच यश मिळवून देतं.

जे ठरवू ते मिळवायची जिद्दच यश मिळवून देतं. ध्येय ठरवून ते मिळवायचच आणि त्यासाठीच जीव तोड़ मेहनत घ्यायची;कायम यशाचाच विचार डोक्यात ठेवून उत्स्फूर्तपणे स्वतः ला संपूर्ण झोकून देऊन काम करायच…

नवीन वर्षाचा हाच संकल्प घेऊन.

संस्थे चे सर्व पदाधीकारी ; सभासद;कर्मचारी हितचिँतक यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. उज्ज्वल व मंगलमय भविष्याची कामना करतो.

आपलाच;

आनंद वाघमारे